शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

६४ माजी संचालकांवर जबाबदारी निश्चित होणार

By admin | Updated: November 19, 2014 23:18 IST

कोल्हापूर बाजार समिती : लवाद नेमण्याची प्रक्रिया सुरू

राजाराम लोंढे - कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या ६४ माजी संचालकांच्या कारभारामुळे समितीच्या झालेल्या आर्थिक नुकसानीबद्दल जबाबदारी निश्चितीची प्रक्रिया सुरू झाली आहे. माजी संचालकांना नोटिसा व त्यांवरील त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आर्थिक नुकसान निश्चित करण्यासाठी लवादाची नेमणूक येत्या आठ-दहा दिवसांत केली जाणार असून, तेच संबंधित माजी संचालक व अधिकाऱ्यांवर नुकसानीची जबाबदारी निश्चित करणार आहेत. बाजार समितीचे आर्थिक नुकसान केल्याची तक्रार वर्षभरापूर्वी विरोधी संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली होती. त्यानुसार सहा वर्षांतील कामकाजाच्या चौकशीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार होती; तोपर्यंत तत्कालीन संचालकांनी गेल्या पंचवीस वर्षांच्या कामकाजाच्या चौकशीची मागणी केली. त्यानुसार जिल्हा उपनिबंधकांनी रंजन लाखे यांच्यामार्फत १९८७ च्या कारभाराची चौकशी केली. यामध्ये अनेक निर्णय बेकायदेशीर घेऊन समितीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केल्याचा ठपका चौकशी अधिकारी रंजन लाखे यांनी ठेवला होता. यासह भूखंड वाटप, नोकरभरती या कारणांनी संचालक मंडळाच्या बरखास्तीची कारवाई केली होती. समितीच्या झालेल्या नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यासाठी बरखास्त संचालकांना नोटिसा लागू केल्या होत्या. त्यानुसार संचालकांचे म्हणणे ऐकून घेण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आता लवाद नेमून त्यांच्यावर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. किती नुकसान झाले हे चौकशी अहवालात नमूद केलेले आहे.