शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सहा कोटींचे शिलकी अंदाजपत्रक चर्चेविना मंजूर

By admin | Updated: February 27, 2015 23:25 IST

इचलकरंजी पालिका : ३३९ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक; करवाढ नसल्याने दिलासा, आवश्यक बाबींसाठी योग्य तरतूद

इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या विशेष सभेत शुक्रवारी ३३९ कोटी सहा लाख ९३ हजार रुपयांचे वार्षिक अंदाजपत्रक सहा कोटी अडीच लाख रुपयांचे शिलकी बजेट ठेवून चर्चेविनाच एकमताने मंजूर करण्यात आले. दरम्यान, या अंदाजपत्रकात आवश्यक बाबींसाठी योग्य तरतूद करण्यात आली असून, नागरिकांवर कोणतीही करवाढ लादण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांना दिलासादायक बजेट नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी सादर केले आहे.नगरपालिकेच्या सभागृहात नगराध्यक्षा बिरंजे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. सन २०१५-१६ साठीच्या वार्षिक अंदाजपत्रकात जमेच्या बाजूमध्ये विविध कर ३३ कोटी ४२ लाख ४३ हजार, विशिष्ट कायद्यान्वये येणारी जमा चार कोटी ४० लाख १५ हजार, कराव्यतिरिक्त मिळणारे उत्पन्न १३ कोटी ३९ लाख ३१ हजार, वर्गणी ग्रँटस् वगैरे ८४ कोटी ९० लाख, किरकोळ उत्पन्न नऊ कोटी ७७ लाख ५२ हजार, त्याचबरोबर भांडवली जमा १५५ कोटी ५९ लाख ६२ हजार, असाधारण कर्ज डिपॉझिट १९ कोटी ९ लाख ८३ हजार, असे एकूण ३२० कोटी ६८ लाख ८८ हजार व सुरुवातीची शिल्लक १८ कोटी ३८ लाख अशी एकूण ३३९ कोटी ६ लाख ९३ हजार २२१ रुपयांच्या जमेच्या बाजू आहेत.खर्चाच्या तरतुदींमध्ये सामान्य कारभार २९ कोटी २५ लाख १० हजार, आग, दिवाबत्ती, सुरक्षितता चार कोटी ३२ लाख ५० हजार, सार्वजनिक आरोग्य सुख-सोयी देखरेख ९४ कोटी २४ लाख ८ हजार, शिक्षण, देणग्या वगैरे ११ कोटी १० लाख ४४ हजार, किरकोळ खर्च, दावे, खटले, इत्यादी तीन कोटी ४९ लाख ६२ हजार, तसेच भागभांडवलीखर्च १७४ कोटी ८९ लाख ३२ हजार, असाधारण कर्ज डिपॉझिट १५ कोटी ७३ लाख २० हजार, असा एकूण अंदाजे खर्च ३३३ कोटी चार लाख ३७ हजार ५६२ रुपयांचा धरण्यात आला आहे. यामधून जमेच्या बाजू वजा करता सहा कोटी दोन लाख ५५ हजार ६५९ रुपये शिल्लक रक्कम धरण्यात आली आहे.सादर करण्यात आलेल्या बजेटमध्ये शहरातील सुरक्षिततेच्यादृष्टीने सीसीटीव्ही बसविण्यासाठी ३६ लाख रुपये, नगरपालिकेच्या वाहनांना ट्रॅकिंग सिस्टीम बसविण्यासाठी पाच लाख रुपये, केंद्र शासनाकडून आलेल्या सूचनेनुसार शहराचा पुढील २५ वर्षांचा शहर विकास आराखड्यासाठी १२ लाख, आरोग्य खात्यासाठी ३३ कोटी १८ लाख, पाणीपुरवठ्यासाठी १८ कोटी ५९ लाख, शिक्षण सहा कोटी १० लाख, शिक्षण समिती पाच कोटी, महिला व बालकल्याण ५५ लाख, आर्थिक दुर्बल घटक योजना एक कोटी ५२ लाख, लेक वाचवा ३० लाख, भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण सात लाख, स्वच्छता सात कोटी, इमारती देखभाल दुरुस्ती दीड कोटी, वाहतूक, आयलंड, सिग्नल, रंगीत कारंजे ४० लाख यासह उन्हाळ्यामध्ये पाणीप्रश्न मिटविण्यासाठी ९८ ठिकाणी सबमर्सिबल पंप व पाण्याच्या टाक्या बसविणे, मुख्य मार्गावर एलईडी दिवे बसविणे, रस्ते, गटार, वृक्षारोपण यासाठीही तरतूद करण्यात आली आहे.दरम्यान, प्रशासनाने सूचविलेल्या अंदाजपत्रकात सुमारे ८५ कोटींची वाढ स्थायी समितीने दाखविली आहे. याबाबत सविस्तर चर्चा करण्याची मागणी नगरसेवक भीमराव अतिग्रे यांनी केली. याकडे दुर्लक्ष करत अन्य सदस्यांनी मंजूर-मंजूर म्हणत चर्चेविनाच अंतिम मंजुरी दिली. जनगणनेत ३५ हजार लोक गायबसभेमधील पहिला विषय सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षणानुसार प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप यादीवर अभिप्राय-ठराव दाखल करणे हा होता. यावर नगरसेवक बाळासाहेब कलागते यांनी आक्षेप घेत ही जनगणना चुकीच्या पद्धतीने करण्यात आली असून, यामध्ये शहरातील ३५ हजार लोक कमी दाखविण्यात आले आहेत. नगरपालिकेची मतदार संख्या व सर्वेक्षण संख्या यामध्ये तफावत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार जनगणनेची सीडी प्रत्येक नगरसेवकाला देऊन त्यांच्या भागातील यादीची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.