शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

संकेश्वर ते आंबोली महामार्गासाठी ५७४ कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:25 IST

कोल्हापूर : पुणे-बंगळूर आणि मुंबई-गोवा या महामार्गाला एकाच वेळी जाेडणाऱ्या संकेश्वर ते बांदा या नव्या महामार्गाच्या बांधणीला पुन्हा एकदा ...

कोल्हापूर : पुणे-बंगळूर आणि मुंबई-गोवा या महामार्गाला एकाच वेळी जाेडणाऱ्या संकेश्वर ते बांदा या नव्या महामार्गाच्या बांधणीला पुन्हा एकदा गती येणार आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यांना जोडून पर्यटन व व्यापाराची व्याप्ती वाढविणाऱ्या या रस्त्यातील संकेश्वर ते आंबोली या ६१ किलोमीटरपर्यंतच्या नव्या रस्त्यासाठी ५७४ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. खासदार संजय मंडलिक यांच्या प्रयत्नामुळे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हा निधी दिला असून, आंबोली ते बांदा या मार्गासाठी पुढील वर्षी निधी मिळणार आहे.

गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ आहे. कोकणामध्येही पर्यटन मोठ्या प्रमाणात आहे. गोवा आणि कोकणात जाण्यासाठी आजरा - आंबोली मार्ग हा जवळचा मार्ग म्हणून वापरला जातो. सध्या या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ होत असून, वाढती वाहतूक लक्षात घेता संकेश्वर ते बांदा या १०८ किलोमीटरच्या रस्त्याला महामार्गाला दर्जा देऊन या रस्त्याचे दुहेरीकरण व्हावे अशी मागणी खासदार मंडलिक यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे केली होती. पर्यटन, व्यापारासह उद्योग धंदा वाढीसह वेळेची बचत होणार असल्याने याला प्राधान्य द्यावे अशी विनंती केली होती. या नव्या महामार्गामुळे महाराष्ट्र व कर्नाटकातील दूध, फळे, भाजीपाला, उद्योगासाठी लागणारा कच्चा-पक्का माल हा रेड्डी पोर्टवरून इतरत्र देशभर पाठविणे शक्य होणार असल्याचेही निदर्शनास आणून दिले. त्यांनी केलेल्या पाठपुराव्याची दखल घेऊन हा निधी मंजूर झाला आहे.

चौकट ०१

असा असेल मार्ग

या मागणीतील पहिला टप्पा म्हणून संकेश्वर - गडहिंग्लज - कोवाडे - आजरा - गवसे - आंबोली ६१ किमी रस्त्याकरिता भू-संपादनासह रस्त्याच्या बांधणीचे काम हाती घेण्याचे ठरले आहे.