शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील बारावीच्या ५२ हजार विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:25 IST

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित रहावे या उद्देशाने शासनाने बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जूनच्या पहिल्या ...

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित रहावे या उद्देशाने शासनाने बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला. या परीक्षेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण ५२ हजार २९९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यामध्ये राज्य शिक्षण मंडळाचे ५१ हजार ७४९, तर सीबीएसई बोर्डाच्या ५५० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राज्य मंडळाने जुलैच्या तिसऱ्या आ‌ठवड्यात दहावीचा, तर आयएससीई बोर्डाने गेल्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर केला. त्यामुळे राज्य मंडळ आणि सीबीएसईच्या बारावीचा निकाल कधी जाहीर होणार याची विद्यार्थी, पालकांनी प्रतीक्षा लागली आहे. अकरावी प्रवेशासाठीच्या सीईटी परीक्षेकरिता अर्ज करण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली. अर्ज करण्याची अंतिम मुदत दि.२ ऑगस्टपर्यंत आहे. शासकीय, अनुदानित आणि खासगी पॉलिटेक्निकमधील प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची मुदत शुक्रवार (दि.३०) पर्यंत आहे. मात्र, या प्रक्रियेला मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. आयटीआय प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पण, अद्याप प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक जाहीर झालेले नाही.

चौकट

सीबीएसई दहावीला ३८०० विद्यार्थी

जिल्ह्यातील सीबीएसई बोर्डाच्या २८ शाळांमधील ३८०० विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यांची परीक्षा देखील रद्द झाली आहे. त्यांचा निकालही अद्याप जाहीर झालेला नाही.