शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

‘गोकुळ’च्या यादीत ५० संस्था प्रतिनिधी मृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) प्रारूप यादी सोमवारी ‘गोकुळ’ दूध संघ व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) प्रारूप यादी सोमवारी ‘गोकुळ’ दूध संघ व सहायक निबंधक (दुग्ध) येथे प्रसिद्ध करण्यात आली. ही यादी एक वर्षापूर्वी संस्था प्रतिनिधींच्या नावाची असल्याने कोरोनासह इतर आजाराने सुमारे ५० ठरावधारक मृत दिसत आहेत. हरकतीच्या पहिल्याच दिवशी तीन संस्थांनी आपले संस्था प्रतिनिधींचे नाव बदलून ठराव दाखल केले.

‘गोकुळ’ ची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून प्रारूप यादी प्रसिद्ध झाली आहे. दुबार ठरावांसह ३६५९ संस्था प्रतिनिधींचा यादीमध्ये समावेश आहे. प्रारूप यादीवर २४ फेब्रुवारीपर्यंत हरकती घेता येणार आहेत. या यादीत एक वर्षापूर्वी संस्था प्रतिनिधींच्या नावाचे ठराव आहेत. वर्षभराच्या कालावधीत सुमारे पन्नास ठरावधारकांचे विविध कारणाने मृत्यू झाल्याचे दिसते. त्यामुळे पहिल्याच दिवशी तीन दूध संस्थांनी हरकत घेत मृत प्रतिनिधींची नावे वगळून दुसऱ्या प्रतिनिधींच्या नावाचा ठराव दाखल केला. यामध्ये ‘अमृतमंथन’ इंगळी (ता. हातकणंगले), सोमेश्वर, खानापूर (आजरा) या संस्थांचा समावेश आहे.

दोन दूध संस्था उच्च न्यायालयात

गेल्यावर्षी ठराव दाखल करण्यासाठी दिलेल्या विहीत वेळेत श्रीकृष्ण-काळकुंद्री, विठ्ठल बिरदेव-पट्टणकोडोली, महालक्ष्मी-काळजवडे, छत्रपती शिवाजीराजे-भुयेवाडी व रेणुका-कुर्डू या पाच दूध संस्थांचे ठरावच आले नव्हते. यापैकी ‘छत्रपती शिवाजीराजे’ व श्रीकृष्ण’ या संस्थांनी ठराव दाखल करून घेण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतल्याचे समजते.

बिनविरोध होणाऱ्या संस्थांचे ठराव बदलणार

सहकार नियम १० (४) नुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसाच्या अगोदर पाच दिवस ठरावधारकांचे नाव बदलता येते. पहिल्या टप्प्यात ८५ दूध संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे निवडणुकीत संचालक मंडळ बदलले तर ठराव बदलू शकतो. मात्र, दूध संस्थांच्या निवडणुकीचा कालावधी व ‘गोकुळ’ची उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया पाहता, ज्या संस्था बिनविरोध होतील, त्यांनाच ठराव बदलता येऊ शकतो.