शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

वाहन खरेदीत तब्बल ५० टक्के घट

By admin | Updated: May 10, 2016 02:24 IST

अक्षय्यतृतीया खरेदी : बाजारात दुष्काळाचे सावट; सोने खरेदीचा मात्र जोर

कोल्हापूर : अक्षय्यतृतीयेनिमित्त होणाऱ्या खरेदीत यंदा आॅनलाईन खरेदीने जोर धरला. सराफांच्या संपामुळे गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त सोने खरेदीसाठी चुकल्याने यंदा अक्षयतृतीयेनिमित्त कोल्हापूरच्या बाजारपेठेत सोने खरेदीसाठी उधाण आले होते. सोमवारी दिवसभरात शहर आणि परिसरात सुमारे १२ कोटी रुपये उलाढाल सोने खरेदीवर झाल्याचे सराफ व्यावसायिकांतून सांगण्यात आले; पण दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत असल्याने त्याचा परिणाम वाहन खरेदीवर मोठ्या प्रमाणावर दिसून आला. वाहन खरेदीमध्ये मात्र यंदा कमालीची घट झाली. गतवर्षीपेक्षा यंदा उलाढालीत सुमारे पन्नास टक्के घट दिसून आली.इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी बाजारपेठ सायंकाळनंतर फुलली होती. त्यामुळे शिवाजी रोड, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, भाऊसिंगजी रोड आदी ठिकाणी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी दुकानात गर्दी होती. विशेषत; एल.ई.डी., फ्रीज, वॉशिंग मशीन आदी वस्तू खरेदीकडे ग्राहकांचा मोठ्या प्रमाणावर ओढा होता. दुकानातच वस्तू खरेदीसाठी विविध बँकांनी कर्जाच्या विविध योजनाही ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्या होत्या.अक्षयतृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभकार्याचे फळ न संपणारे असे मिळते. अक्षयतृतीयेचा दिवस हा सोने खरेदीसाठी शुभ मानला जातो. गेल्या महिन्यातील गुढीपाडव्याचा शुभमुुहूर्त सोने खरेदी करण्यासाठी चुकल्याचा परिणाम यंदा अक्षयतृतीयेवर दिसून आला. सोन्याच्या किमतीत चढ-उतार होत असला तरीही सोने खरेदीसाठी ग्राहकांनी बाजारपेठ फुलली होती. सराफ बाजारपेठेत काहींनी दुकानांना विद्युत रोषणाई करून सायंकाळी ग्राहकांना आकर्षण करण्याचाही प्रयत्न केला.