शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

अहिल्यादेवी होळकर यांच्या कोल्हापुरातील स्मारकासाठी ५० लाख मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:17 IST

कोल्हापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले भव्य स्मारक आपटेनगर (नवीन वाशी नाका) येथे साकारण्यात येणार आहे. ...

कोल्हापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले भव्य स्मारक आपटेनगर (नवीन वाशी नाका) येथे साकारण्यात येणार आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. स्मारकाच्या कामाची सुरुवात लवकरच केली जाईल, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी येथे सांगितले.

येथील शाहू स्मारक भवनच्या प्रांगणात मल्हार सेना व युवक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९६ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गेल्यावर्षी जयंतीदिनी कोल्हापुरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आपटेनगर येथील सहा हजार चौरस फूट जागेत हे स्मारक उभारण्यात येणार आहे. कोरोनामुळे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत या स्मारकाच्या कामाचा प्रारंभ करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी माजी नगरसेवक राजसिंह शेळके, राहुल माने, मोहन सालपे, धनगर महासंघाचे राघू हजारे, नूतन नागरी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पुजारी, पणनचे विभागीय उपसरव्यवस्थापक सुभाष घुले, शहाजी सीद, आनंदा देशिंगे, प्रकाश येडगे, प्रल्हाद देबाजे, बाबूराव बोडके, भारत शेळके, अनिकेत रानगे, उत्तम सीद, बाळासाहेब कोळेकर, अवधूत पाटील उपस्थित होते. मल्हार सेनेचे सरसेनापती बबन रानगे यांनी प्रास्ताविक केले. ‘गोकुळ’चे संचालक बयाजी शेळके यांनी आभार मानले.

चौकट

स्मारक असणार असे

या स्मारकामध्ये अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा आणि त्यांच्या कार्याचे दर्शन घडविणारी विविध १५ शिल्प, वाचनालय, कलादालन, सभागृह, बगीचा असणार आहे. स्मारकाला एकूण अडीच कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी महापालिकेने ३० लाख, तर पालकमंत्री पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव यांनी एकूण २० लाखांचा निधी दिला आहे. कोरोनामुळे यंदा साध्या पद्धतीने जयंती साजरी केली असल्याची माहिती बबन रानगे यांनी दिली.

फोटो (३१०५२०२१-कोल-अहिल्यादेवी होळकर जयंती) : कोल्हापुरात सोमवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९६ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पालकमंत्री सतेज पाटील यांनी अभिवादन केले. या वेळी बबन रानगे, बयाजी शेळके, राजसिंह शेळके, राहुल माने आदी उपस्थित होते.