शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणांत अडकली शिपायांची ४३ पदे

By admin | Updated: February 12, 2015 00:24 IST

जिल्हा परिषद : परीक्षेचा निकाल ठेवला राखून

कोल्हापूर : जिल्हा परिषदेमधील भरती प्रक्रियेतील शिपाई पदाच्या ४३ जागांचा निकाल मराठा व मुस्लिम आरक्षणाच्या स्थगितीमुळे राखून ठेवला आहे. मंगळवारीच राज्य मंत्रिमंडळाने स्थगितीपूर्वी जातवैधता प्रमाणपत्र मिळालेल्या उमेदवारांची मराठा आरक्षणानुसार सरकारी व निमसरकारी सेवेतील निवड कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु याबाबत लेखी मार्गदर्शन न आल्याने ते आल्यानंतरच याबाबत पुढील कार्यवाही केली जाईल, असे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले.नोव्हेंबर महिन्यात जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व वर्ग ४ च्या १८३ जागांसाठी परीक्षा झाली. यामधील शिपाई पदाच्या ४३ जागांच्या परीक्षेचा निकाल हा मराठा व मुस्लिम आरक्षणाच्या स्थगितीमुळे राखून ठेवण्यात आला; परंतु कालच मंत्रिमंडळाचा निर्णय याबाबत होऊन वृत्तपत्रांतून प्रसिद्धीही झाली आहे; परंतु या संदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाकडे लेखी स्वरूपात कोणताही शासकीय आदेश आलेला नाही. त्यामुळे या संदर्भातील निर्णय शासकीय मार्गदर्शन आल्यानंतरच होणार आहे.इतर पदांच्या परीक्षांचे निकाल होऊन त्याबाबतचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सहीने संबंधितांना पोस्टाने पाठविण्यात आले आहेत. आतापर्यंत पर्यवेक्षिका व विस्तार अधिकारी (पंचायत) या पदांचे आदेश पाठविण्यात आले आहेत. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), स्थापत्य अभियांत्रिकी सहायक व कनिष्ठ आरेखक या पदांच्या निकालाबाबतची टिप्पणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली आहे. त्यांच्या सहीने याबाबतचे आदेश काढले जाणार आहेत. उर्वरित इतर ग्रामसेवक, आरोग्य सेवक, औषध निर्माण अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, आदी पदांची आदेश काढण्यासंदर्भातील प्रक्रियाही सुरू असून, येत्या आठ दिवसांत ती पूर्ण होईल, असे सामान्य प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)