शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जतजवळील ४२ गावांचा कर्नाटकात जाण्याचा इशारा

By admin | Updated: June 16, 2015 01:15 IST

पाणीप्रश्न पेटणार : नाहरकत प्रमाणपत्राची शासनाकडे मागणी

जत : जत तालुक्याच्या पूर्व भागातील ४२ गावांना म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेतून शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी मिळावे, अशी मागणी गेल्या पाच वर्षापासून केली जात आहे. याकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केल्याने या ४२ गावांना कर्नाटकात जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नाहरकत प्रमाणपत्र (एन. ओ. सी) द्यावे, अशी मागणी पाणी संघर्ष समितीने केली आहे. जत तालुका सांगली जिल्ह्यात भौगोलिक विस्ताराने मोठा आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेचे पाणी आले आहे.पश्चिम भागात पाणी आल्यामुळे पूर्व भागातील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शेती व पिण्याच्या पाण्यासाठी ४२ गावांतील नागरिकांनी पाणी संघर्ष समितीची स्थापना करून शासनदरबारी या मागणीचा पाठपुरावा सुरु ठेवला. वेळोवेळी उपोषण, मोर्चा, रास्ता रोको आंदोलन, चर्चासत्र, पदयात्रा काढून प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी त्यांनी लोकवर्गणी जमा केली आहे. लोकसभा निवडणुकीत पाणी संघर्ष समितीने खा. संजय पाटील यांना पाठिंबा देऊन समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा प्रचार केला होता. त्यावेळी पाणी देण्याचे आश्वासन संजय पाटील यांनी दिले होते. विधानसभा निवडणुकीत समितीने आमदार विलासराव जगताप यांना पाठिंबा दिला होता. त्यांनीही ४२ गावांचा म्हैसाळ योजनेत समावेश करण्यासाठी प्रयत्न करु व पाणी देऊ, असे आश्वासन दिले होते. लोकसभा निवडणुका होऊन वर्ष, तर विधानसभा निवडणुका होऊन सहा महिने झाले आहेत. परंतु पाणी संघर्ष समितीला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे पूर्व भागातील नागरिक आक्रमक झाले आहेत. (प्रतिनिधी)कर्नाटकात जाण्यास नाहरकतजत तालुका महाराष्ट्र -कर्नाटक राज्याच्या सीमेवर आहे. सीमा भागापासून यात सुमारे दोन किलो मीटर आत कर्नाटक राज्यातून तुबची - बबलेश्वर योजनेचा कालवा गेला आहे. तेथून सायफन (उताराने) पध्दतीने पाणी जत तालुक्यातील बोर नदीच्या पात्रात व तेथून संख (ता. जत) मध्यम प्रकल्पात येणार आहे. जत तालुक्यातील आठ दहा साठवण तलाव भरुन झाल्यानंतर हे पाणी परत चडचण (कर्नाटक) येथे जाणार आहे. त्यामुळे जत तालुक्याच्या पूर्व भागातील ४२ गावांना म्हैसाळ ऐवजी कर्नाटकातून पाणी देणे सोईचे होणार आहे.