गारगोटी : युवा स्पोर्टस्, गारगोटी मंडळाचा ३२ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आमदार प्रकाश आबिटकर प्रमुख उपस्थित होते.
यावेळी गारगोटी येथील जेष्ठ नागरिक बी एस माने यांच्या हस्ते मंडळाच्या मुख्य शाखेच्या फलकास पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. १९८८ मध्ये या मंडळाची सुरुवात करण्यात आली. गणेश उत्सवाकरिता सुरू केलेल्या मंडळाने गेली ३२ वर्षे सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात मोठे काम केले आहे. मंडळाने अल्पावधीत राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यांमध्ये आपल्या शाखांचा विस्तार केलेला आहे. यावेळी प्राचार्य अर्जुन आबिटकर, बाजीराव चव्हाण, बी.एस.माने, मिलिंद पांगीरेकर, दत्तात्रय परीट, रफीक बागवान, ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव मोरे, सुशांत सूर्यवंशी, रणधीर शिंदे, अजित चौगले, दीपक खोत, युवराज नाईक, मंडळाचे सदस्य तानाजी आबिटकर, महेश सुतार, चिदंबर कलकुटकी, यांच्यासह मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रशांत भोई यांनी केले तर आभार अल्ताफ बागवान यांनी मानले.
फोटो : वर्धापन दिनास उपस्थित आमदार प्रकाश आबिटकर, बी.एस.माने, बाजीराव चव्हाण, मिलिंद पांगीरेकर, सर्जेराव मोरे, अजित चौगले, दीपक खोत आदी.