शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

रायगडावर ३२ मणाचे सुवर्ण सिंहासन

By admin | Updated: May 29, 2017 23:15 IST

रायगडावर ३२ मणाचे सुवर्ण सिंहासन

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे ३२ मण वजनाचे सुवर्ण सिंहासन उभे करण्याचा निर्णय घेतला असून, त्याची सुरुवात करण्यासाठी येत्या ४ जूनरोजी किल्ले रायगडावर संकल्प सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे (गुरुजी) यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. भिडे म्हणाले की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदानानंतर रायगड मुघल सत्तेच्या हाती पडला. मुघलांनी रायगडावरील सर्व वस्तू व ऐतिहासिक कागदपत्रे जाळून नामशेष केली. ३२ मण वजनाच्या सुवर्ण सिंहासनाच्या चिरफाळ्या करून ते लुटून नेले. या घटनेला आज ३२९ वर्षे झाली आहेत. आता श्री शिवप्रतिष्ठानने हिंदवी स्वराज्याचे ते सिंहासन पुनर्संस्थापित करण्याचा निश्चय केला आहे. यासाठी सर्व धारकरी, शिवसैनिक व शिवपाईकांनी सिंहासनाच्या पुनर्संस्थापनेचा सामूहिक संकल्प करण्यासाठी ४ जूनला रायगडावर उपस्थित राहावे. छत्रपती शिवरायांचे हे सुवर्ण सिंहासन संपूर्ण राष्ट्राला प्रेरणादायी ठरेल. सुमारे दोन लाख धारकरी उपस्थित राहतील. संकल्प सोहळ्यास ३ जूनला रात्री नऊपासून प्रारंभ होईल. दि. ४ रोजी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम संपेल.ते म्हणाले की, या सुवर्ण सिंहासन संकल्पास मोठी आर्थिक मदत मिळेल. मदत स्वीकारण्यासाठी संस्थेची स्थापना होणार आहे. याची घोषणा रायगडावर कार्यक्रमात केली जाईल. संस्थेच्या बँक खात्यावर मदत जमा करून घेतली जाईल. अनेकजण सोने देण्यास पुढे आले आहेत. पण आम्ही त्यांना पैशाच्या स्वरूपात मदतीचे आवाहन केले आहे. सुवर्ण सिंहासन बनविण्यास काही कलाकारही पुढे आले आहेत. लवकरच संकल्प पूर्ण केला जाईल. सिंहासनाच्या सुरक्षेसाठी शिवप्रेमींची फौज उभी केली जाईल. या कार्यक्रमास येणाऱ्या धारकऱ्यांनी भगवा फेटा बांधावा. रायगडावर कोणतेही खाद्यपदार्थ विकत घेऊ नयेत. स्वत:ला पुरेल एवढी चारवेळची शिदोरी व दोन जलकुंभ येताना घेऊन यावे. प्रत्येक धारकऱ्याने रायगडावर हिंदवी स्वराज्य व्रताची दीक्षा व शपथ घ्यायची आहे. त्यासाठी स्वत:बरोबर दोन जानवी आणावीत. सरकारकडे जाणार नाही!संभाजीराव भिडे (गुरुजी) म्हणाले, राजकीय पक्ष, राजकारण व राजकीय नेतृत्व न घेता हे कार्य पूर्ण केले जाईल. केंद्र व राज्य सरकारची परवानगी घेणार नाही. हे सुवर्ण सिंहासन लवकरच तयार करण्याचा मानस आहे. यासाठी कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी सरकारच्या दारात जाणार नाही.