शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

सहलीसाठी ३०० एस.टी.बस

By admin | Updated: December 8, 2015 00:43 IST

प्रवास स्वस्त : सेवा करातील सूटचा शाळांना फायदा

कोल्हापूर : राज्य शासनाने शालेय सहलींच्या सेवाकरात सूट दिल्याने यंदापासून शालेय सहली पालकांच्या बजेटमध्ये उरकणार आहेत. याचा लाभ जास्तीत शाळांनी घ्यावा, यासाठी एस. टी. महामंडळही सरसावले आहे. मध्यवर्ती बसस्थानकाच्या वतीने शाळा व महाविद्यालयीन सहलीसाठी ३०० जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. शाळांतील चार भिंतींच्या आतील शिक्षणाबरोबर व्यावहारिक जगाचे ज्ञान मिळावे, या उद्देशाने शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांची माहिती व्हावी, यासाठी अनेक वर्षांपासून शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते. मात्र, शैक्षणिक सहलीला एस.टी.नेच जा, असा सल्ला शिक्षण विभाग देत असला तरी अशा सहलींसाठी खासगी आरामगाड्यांना शाळांकडून दिली जाणारी पसंती हा चिंतेचा विषय बनली आहे. प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन्ही स्तरांवर डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारीत या सहलींचे आयोजन करण्यात येते. शाळेच्या सहलीसाठी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाकडून परवानगी घेतली जाते. सहलीसाठी एस. टी. बस असल्याशिवाय परवानगीच दिली जात नाही. मात्र, काही शाळा खासगी वाहनांना पसंती देतात. यासाठी शैक्षणिक विभागातर्फे कडक पावले उचलण्याची गरज आहे. शालेय सहलीसाठी महामंडळाच्या वतीने पन्नास टक्के सवलत दिली जाते. तसेच आता सेवाकरात १२.३६ टक्के सूट दिल्याने सहल आवाक्यात येणार आहे. सुरक्षित व नियोजनपूर्वक गाड्यांसाठी शाळांनी एस.टी.चा लाभ घ्यावा. गत दोन वर्षांत शालेय सहलीसाठी १ हजार ८७ एस. टी. गाड्यांचे बुकिंग केले होते. यंदा सेवाकर कमी केल्याने शाळांना किमान एका दिवसाला पाचशे रुपये कमी खर्च द्यावा लागणार आहे. त्याचा लाभ शाळांनी घ्यावा. - अभय कदम, स्थानकप्रमुख, मध्यवर्ती बसस्थानक सहलीसाठी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाकडून परवानगी काही शाळा खासगी वाहनांना पसंती देतात. यासाठी शैक्षणिक विभागातर्फे कडक पावले उचलण्याची गरज