शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

गिरणीला वर्षाला २.७० कोटींची बचत

By admin | Updated: August 9, 2015 23:48 IST

खासगी वीज : आयकोस्पिन घेणार मित्तलची वीज

इचलकरंजी : बड्या उद्योगांना खासगी कंपन्यांकडून स्वस्त भावात वीज मिळू लागल्याने येथील सूतगिरण्यांनी खासगी कंपन्यांची वीज घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. येथील आयकोस्पिन ही सूतगिरणी मित्तल पॉवर प्रोसेसर्स लि. या कंपनीकडून वीज घेणार असून, त्यामुळे वीज बिलामध्ये वार्षिक २.७० कोटी रुपयांची बचत होणार आहे. याच धोरणाने आता इंदिरा महिला सहकारी सूतगिरणी व नवमहाराष्ट्र सहकारी सूतगिरणी या गिरण्याही वीज घेणार आहेत.सहकारी सूतगिरण्यांना अधिकृतपणे घ्यावा लागणारा कापूस आणि सुताच्या उत्पादनावर द्यावा लागणारा कर यामुळे खासगी गिरण्यांपेक्षा सहकारी सूतगिरण्यांच्या सुताच्या उत्पादन खर्चात वाढ होते. त्याचबरोबर अलीकडील काळात कापूस व सुताच्या भावात असलेली अस्थिरता, यामुळे सहकारी सूतगिरण्यांना नुकसान सोसावे लागत असे. त्यातच दरवर्षी महाराष्ट्रातील विजेचे भाव वाढत आहेत. एकूण बाजारात असलेली सुताची किंमत व उत्पादन खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने सूतगिरण्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसू लागला. यावर उपाय म्हणून वीज निर्मितीचे (इलेक्ट्रिसीटी जनरेशन) उभारून पाहिले. मात्र, इंधनाच्या किमतीही प्रचंड वाढल्या आणि प्रकल्पांची वीजही महाग झाली.अलीकडील काळात सरकारने खासगी वीज निर्मितीला प्राधान्य दिले आहे. काही खासगी कंपन्यांनी झारखंड, छत्तीसगड अशा आदिवासी क्षेत्र असलेल्या राज्यात वीज निर्मितीचे प्रकल्प उभारले आहेत. या प्रकल्पांना काही प्रमाणात करमाफी दिली असून, त्यांना अन्य प्रकारच्या सवलतीसुद्धा सरकारने दिल्या आहेत. साहजिकच अशा खासगी क्षेत्रातील प्रकल्पांची वीज स्वस्त भावात उपलब्ध झाली आहे.खासगी कंपन्यांच्या प्रकल्पांची वीज ‘नॅशनल ग्रीड’ला दिली जाते. आवश्यकतेनुसार संबंधित राज्यात वीज घेण्यासाठी नॅशनल ग्रीडमधून स्टेट ग्रीडमध्ये घेतली जाते आणि मागणीप्रमाणे ही वीज मागणी करणाऱ्या उद्योगाला पुरविली जाते. त्यासाठी खासगी कंपनीकडून ‘त्या’ ग्रीडला वाहन भाडे दिले जाते. अशा प्रकारे आता ‘महावितरण’च्या वीज दरापेक्षा खासगी कंपन्यांच्या वीज दरामध्ये प्रतियुनिट सरासरी सव्वारुपयांची तफावत (म्हणजे सव्वारुपये स्वस्त) राहणार आहे. (प्रतिनिधी)महिना २२.५ लाख रुपयांची बचतसूतगिरण्यांना सध्या औद्योगिक दराने वीज पुरवली जाते. त्याचा ‘महावितरण’चा दर प्रतियुनिट आठ रुपये असणार आहे. जो जूनपासून दरवाढ होण्यापूर्वी सात रुपये २५ पैसे होता. आयकोस्पिनला आता ‘मित्तल’ कडून मिळणारी वीज पाच रुपये ७५ पैसे ते सहा रुपये प्रतियुनिट अशी मिळणार आहे. त्यामुळे ‘आयकोस्पिन’सारख्या सूतगिरणीला महिन्याला २२.५ लाख रुपयांची बचत अपेक्षित आहे.