शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

सत्तर वर्षात अडीच लाख मेगावॅट वीज

By admin | Updated: December 25, 2014 00:06 IST

महावितरण कंपनी : मागणी वाढल्याने वीजनिर्मितीही वाढली

मेहरुन नाकाडे - रत्नागिरी -भारतात २४ जुलै १८७९ला वीज सुरु झाली. पीडब्ल्यू फेल्युरी आणि कंपनीने वीजप्रयोग दाखवला. ३१ डिसेंबर १९४७ला १३६२ मेगावॅट वीजनिर्मिती होत होती. आता ३० नोव्हेंबर २0१४ अखेर २ लाख ५५ हजार १३ मेगावॅट इतकी वीजनिर्मिती होऊ लागली आहे. मागणी वाढल्यामुळे वीजनिर्मितीही वाढली आहे. गेल्या ७७ वर्षांचा आढावा घेतला असता १३६२ वरुन २ लाख ५५ हजार १३ मेगावॅट इतकी वीजनिर्मिती क्षमता वाढली आहे.मेसर्स किलप आणि कंपनीने कलकत्ता शहरात ७ जानेवारी १८९७ला वीज वितरणाचा परवाना मिळविला. पुढे कलकत्ता इलेक्ट्रिक सप्लाय कॉर्पोरेशन असे त्याचे नामकरण झाले. बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय व ट्रॉम्ब्वे कंपनीतर्फे १८८२ला मुंबईत विजेचा प्रयोग दाखविण्यात आला. तद्नंतर १९०५ला मुंबईत ट्रामसाठी वीजपुरवठा सुरु झाला. १८९७मध्ये दार्जिलिंग नगरपालिकेने सीद्रा कोम येथे पाण्यापासून वीज निर्मिती सुरु केली. मुंबईमध्ये विजेवरची पहिली रेल्वेगाडी छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कुर्ला मार्गावर १९२५मध्ये धावली. त्यानंतर १९३१मध्ये मीटरगेज मार्गावर मद्रास ब्रीज ते तंबरम् मार्गावर धावली. ३१ डिसेंबर १९४७ रोजी भारतामध्ये प्रत्यक्ष वीजनिर्मितीला प्रारंभ झाला. सुरुवातीला १३६२ मेगावॅट इतकी सुरुवातीला वीजनिर्मिती होत होती. साहजिकच ग्राहकांकडून विजेची मागणी वाढल्यामुळेच वीजनिर्मिती वाढविण्यात आली. मागणीनुसार महावितरणकडून वीजपुरवठा करण्यात येत आहे. फिडरनिहाय भारनियमन सुरु केल्याने सध्या मागणी व पुरवठ्यामध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न सुरु आहे. ज्या फिडरवर वीजगळती अधिक व वीजबिल वसुली कमी आहे, त्या फिडरवर प्राधान्याने भारनियमन सुरु आहे. संबंधित पॅटर्नचा अवलंब महाराष्ट्रालगतची अन्य राज्येदेखील करु लागली आहेत.नोव्हेंबरअखेर संपूर्ण देशामध्ये १ लाख ४८ हजार १६६ मेगावॅट इतकी विजेची मागणी नोंदविण्यात आली होती. फिडरनिहाय भारनियमन करुन महावितरणकडून १ लाख ४१ हजार १६० मेगावॅट इतका वीजपुरवठा करण्यात आला आहे. उत्तरी क्षेत्रातील राज्यांकडून ५१ हजार ९७७ मेगावॅट विजेची मागणी करण्यात आली असता ४७ हजार ६४२ मेगावॅट वीजपुरवठा करण्यात आला आहे. पश्चिमी क्षेत्रातील राज्यांकडून ४४ हजार १६६ मेगावॅट विजेची मागणी नोंदविण्यात आली होती. पैकी ४२ हजार ७४७ इतका विजेचा पुरवठा करण्यात आला आहे. दक्षिण क्षेत्रातील राज्यांकडून ३९ हजार ९४ मेगावॅट विजेची मागणी करण्यात आली होती. पैकी ३५ हजार ६९८ मेगावॅट वीजपुरवठा करण्यात आला आहे. पूर्व क्षेत्रातील राज्यांकडून १६ हजार ९०९ मेगावॅट विजेची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्यांना १६ हजार ६०९ मेगावॅट वीजपुरवठा करण्यात आला आहे. उत्तर पूर्व क्षेत्रातील राज्यांकडून २ हजार ५२८ मेगावॅट विजेची मागणी करण्यात आली होती. पैकी २ हजार १४१ मेगावॅट विजेचा पुरवठा करण्यात आला आहे. संपूर्ण देशाचा विचार विजेच्या पुरवठ्यात करता - ४.७ टक्के घट झालेली दिसून येत आहे.विजेचे स्रोत विजेच्या पुरवठ्यात - ४.७ टक्क्यांनी घट.पूर्व क्षेत्रातील राज्यांकडून १६ हजार ९०९ मेगावॅट विजेची मागणी.स्रोतवीज निर्मितीकोळसा१,५३,५७१ गॅस२२,९७१डिझेल१,२००अणुऊर्जा ४,७८०जलविद्युत४०,७९९अन्य७२,४९१