शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

अपहाराचे २५ लाख होणार १५ वर्षांनी वसूल

By admin | Updated: September 24, 2016 00:01 IST

जि. प. च्या वित्त विभागाचा निर्णय : शाहूवाडी, हातकणंगलेतील प्रकरणे

समीर देशपांडे ल्ल कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वित्त विभागांतर्गत गेल्या काही वर्षांत झालेल्या ३३ लाख २७ हजार रुपयांच्या अपहारांपैकी अजूनही २५ लाख रुपयांची वसुली बाकी असून, तब्बल १५ वर्षांनी ही रक्कम वसूल होणार आहे. शाहूवाडी, हातकणंगले व गडहिंग्लज तालुक्यांतील ही प्रकरणे आहेत. पैसे हडप करणाऱ्यांपैकी एकाने आत्महत्या केली, तर एकाचे निधन झाल्याने आता त्यांच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या निवृत्तिवेतनातून ही वसुली केली जात आहे. २00३च्या दरम्यान के. एस. मोमीन (मूळ गाव इस्लामपूर) हे शाहूवाडी पंचायत समितीकडे कनिष्ठ लेखाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी सन २00३-0४ ते २00६-0७ या कालावधीत इंदिरा आवासच्या लाभार्थींचे पैसे आपले नातेवाईक आणि मित्रांच्या नावावर जमा करून ११ लाख ९७ हजार ३0६ रुपयांचा अपहार केला होता. गटविकास अधिकाऱ्यांनी सही केलेली यादी बँकेत न देता आपल्या सहीची यादी बँकेत देऊन त्या खात्यांवर पैसे जमा करून ते हडप करण्यात आले होते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल झाला व त्यांची चौकशी सुरू झाली. त्यामुळे त्यांनी बदनामीच्या भीतीने आत्महत्या केली. आता त्यांच्या पत्नीला जी पेन्शन मिळते, त्यातून दरमहा पाच हजार रुपये याप्रमाणे आतापर्यंत दोन लाख ६५ हजार १४0 रुपये वसूल करण्यात आले आहेत. नऊ लाख ३२ हजारांची वसुली अजून बाकी आहे. त्यासाठी १५ वर्षे लागणार आहेत. तसेच हातकणंगले पंचायत समितीकडे वरिष्ठ सहायक म्हणून ए. एम. काटकर २00३-0४ ते २00६-0७ या कालावधीत कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी वैद्यकीय बिले दुबार टाकून, बोगस बिले तयार करून आठ लाख ८५ हजारांचा अपहार केला होता. त्यांची चौकशी सुरू झाल्यानंतर त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात सुरू असलेल्या कौटुंबिक निवृत्तिवेतनातून दरमहा पाच हजार याप्रमाणे आतापर्यंत दोन लाख ८0 हजार रुपये वसूल झाले असून, अजून १0 वर्षांनी उर्वरित सहा लाख रुपयांची पूर्ण वसुली होणार आहे. या प्रकरणामध्ये तत्कालीन सहा. लेखाधिकारी मिसाळ यांच्या ३ वेतनवाढी रद्द करण्यात आल्या होत्या. एखाद्या शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्याने अपहार केला आणि तो सिद्ध झाला तर त्याच्या भविष्यनिर्वाह निधीतून त्या रकमेची वसुली करता येते. त्याच्या निवृत्तिवेतनातूनही कपात करता येते. तसेच त्याच्या निधनानंतर जे कौटुंबिक निवृत्तिवेतन सुरू असते, त्यातून चरितार्थासाठीची आवश्यक रक्कम वजा जाता ठरावीक रक्कम कपात करून भरपाई करून घेतली जाते. वरील तीनही प्रकरणांमध्ये पाच हजार रुपयांची कपात कौटुंबिक निवृत्तिवेतनातून करण्यात येते. या वसुलीसाठी अजून बराच काळ गडहिंग्लज पंचायत समितीमध्ये कनिष्ठ सहायक लेखाधिकारी म्हणून २00१ ते २00६ या कालावधीत कार्यरत असणारे कसबा सांगाव येथील आर. आर. जाधव यांनी १२ लाख ४५ हजार रुपयांचा अपहार केला होता. वैद्यकीय बिले दोन-दोनवेळा काढणे, व्यवसाय कर भरण्याऐवजी तो खिशात घालणे, कर्मचाऱ्यांच्या रिकरिंगची रक्कम पोस्टात न भरणे आणि मैलकुलींचा पगार हडप करून या रकमेचा अपहार केला होता.