शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

शहरात २२ हजारांवर दुबार नावे

By admin | Updated: September 29, 2015 00:48 IST

राष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडीची तक्रार : १७ हजार मतदार एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात

कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाने तयार केलेल्या प्रारूप मतदार यादीत सुमारे २२ हजार ६९६ मतदारांची दुबार नावे असल्याचा तसेच १७ हजार ६३ मतदारांची नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेली असल्याचा दावा राष्ट्रवादी कॉँग्रेस-जनसुराज्य आघाडीने केला असून, त्याबाबतच्या लेखी पुराव्यांसह आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. याबाबत प्रशासनाने तातडीने योग्य ती दुरुस्ती करून मतदारांना न्याय दिला नाही, तर मात्र नाइलाजाने आम्हाला न्यायालयात दाद मागावी लागले, असा इशारा आघाडीचे प्रवक्ते प्रा. जयंत पाटील व गटनेते राजेश लाटकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला. मनपा निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या ८१ प्रभागांतील प्रारूप मतदार याद्यांवर राष्ट्रवादी, कॉँग्रेस, भाजप, जनसुराज्य, आदी विविध राजकीय पक्षांनी आक्षेप घेतले होते. त्याही पुढे जाऊन राष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडीने सोमवारी २२ हजार ६९६ मतदारांची दुबार नावे तसेच १७ हजार ६३ मतदारांची नावे ते ज्या प्रभागात राहतात, तेथील मतदार यादीत न समाविष्ट होता ती अन्य प्रभागांत समाविष्ट झाल्याची बाब प्रशासनाच्या नजरेस आणून दिली आहे. विधानसभेच्या यादीत ज्यांची नावे होती, परंतु मनपाच्या यादीत दिसत नाहीत असे ५८ मतदार आढळून आले आहेत. म्हणजे त्यांना मतदानास मुकावे लागणार आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात असलेले, परंतु आता दक्षिणमध्ये समावेश झाला आहे असे १८०० मतदार आढळून आले आहेत. त्यामुळे या मतदारांच्यावतीने प्रा. जयंत पाटील व राजेश लाटकर यांनी लेखी तक्रार प्रशासनाकडे दिली. ही तक्रार देताना मतदाराचे नाव, पत्ता, मतदार यादीतील अनुक्रमांक, भाग यासह सर्व माहिती देण्यात आली आहे. प्रा. जयंत पाटील म्हणाले की, मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचे आम्ही सुरुवातीपासूनच सांगत आलो आहोत. आम्ही आमच्या यंत्रणेतून मतदार यादींची शोधमोहीम हाती घेतली आणि झालेल्या वास्तव चुका प्रशासनासमोर मांडल्या आहेत. मतदार यादीतील या चुका मुद्दाम घडवून आणलेल्या आहेत, असा आमचा दावा आहे. प्रारूप मतदार यादीवर काँग्रेसचीही हरकतकोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या कामे राज्य निवडणूक आयोगामार्फत प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादी सदोष व बेकायदेशीर असल्याचा आरोप राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यावतीने शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनी केला असून या प्रारूप मतदार यादीवर पक्षाच्यावतीने हरकती घेण्यात आल्या आहे. याबाबत आयुक्तांना पक्षाच्यावतीने निवेदन देण्यात आले असून सुचविलेल्या हरकतींवर कोणताही विचार न केल्यास न्यायालयात धाव घ्यावी लागेल, असाही इशारा पत्रकाद्वारे केला आहे. हरकतींमध्ये म्हटले की, एकूण ८१ प्रभागांपैकी ९ प्रभागांत ७००० ते ८१६५ अशा मतदारांची नोंद प्रारूप मतदार यादीत केली आहे. त्या प्रभागाचे क्र. २५, २७, ३१, ३२, ३३, ४८ असे आहेत. या प्रभागांत पूर्वीपासून रहिवाशी असलेल्या बहुतांश नागरिकांची नावे या मतदारसंघांत संबंधित प्रभागांत नमूद केलेली नाहीत. ती नावे त्या मतदारांशी संबंधित नसलेल्या इतर जवळच्या व लांबच्या प्रभागात जाणूनबुजून समाविष्ट केलेली आहेत.