शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

२१०० जात प्रमाणपत्रांचे वाटप

By admin | Updated: June 4, 2015 00:45 IST

विशेष मोहीम : समितीकडून पाच हजार दाखल्यांची छाननी

कोल्हापूर : विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने विशेष वाटप अभियानांतर्गत पडताळणी केलेल्या निर्वेध ५००० जात प्रमाणपत्रांपैकी २१०० प्रमाणपत्रांचे सोमवारी वाटप केले. उर्वरित प्रमाणपत्रांचे वाटप विचारे माळ येथील कार्यालयात होत आहे. समितीने गेल्या महिन्याभरात १ जूनला विशेष अभियानांतर्गत जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यासाठी गेल्या महिन्याभरात शैक्षणिक सेवा याकरिता आलेल्या अर्जांपैकी तब्बल ५००० जात प्रमाणपत्रांची पडताळणी समितीने छाननी करीत तयार केली आहे. ही तयार प्रमाणित केलेली प्रमाणपत्रे घेण्यासाठी समितीने अर्जदारांना एसएमएस पाठविले होते. त्यापैकी सोमवारी २१०० प्रमाणपत्रांचे उमेदवारांना वाटप करण्यात आले. उर्वरित प्रमाणपत्रांचे वाटपही केले जात आहे. ही तयार प्रमाणपत्रे वाटप करण्यासाठी कार्यालयाने विशेष खिडक्यांसह यंत्रणा सज्ज ठेवली आहे. त्यातूनही उरलेली प्रमाणपत्रे नियमित कार्यालयीन वेळेत उमेदवारांना घेऊन जाता येणार आहेत. समितीने पडताळणी केलेली प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी अर्जदारांनी जातीचा दाखला, ओळखपत्रासह स्वत: हजर राहणे गरजेचे आहे. ज्या अर्जदारांना प्रमाणपत्र घेण्यासाठी स्वत: हजर राहणे शक्य नाही, अशांनी आपले आई-वडील, बहीण-भाऊ किंवा चुलत्यांना पाठवून द्यावे; पण त्यांच्यासोबत ‘बार्टी’च्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेले अर्जदाराचे संमतीपत्र, अर्जदाराच्या जातीच्या दाखल्याची झेरॉक्स, ओळखपत्राची झेरॉक्स, तसेच स्वत:चे ओळखपत्र द्यावे. त्याशिवाय दाखला दिला जाणार नाही. जातपडताळणी प्रमाणपत्र घेतल्यानंतर त्यावरील जात प्रमाणपत्र क्रमांक, स्पेलिंग व अन्य तपशील अर्जदारांनी तपासून घेण्याचे आवाहनही समितीने केले आहे. ज्यांची कागदपत्रे अपूर्ण आहेत, त्या उमेदवारांनी अपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करावी व ज्यांची कागदपत्रे पूर्ण आहेत, अशा सर्व उमेदवारांनी ही मोहीम संपल्यानंतरही कार्यालयाशी संपर्क साधून प्रमाणपत्र ताब्यात घेण्याचे आवाहन समितीचे सदस्य सचिव भालचंद्र मुळे व वृषाली शिंदे यांनी केले आहे.