शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

‘थेट पाईपलाईन’ साठी२१ कोटी २७ लाखांचा निधी

By admin | Updated: May 19, 2014 00:45 IST

कोल्हापूर : कोल्हापूरकरांचे स्वप्न असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईनसाठी राज्य शासनाने आपल्या हिश्श्याच्या निधीपैकी पहिला टप्पा म्हणून

 कोल्हापूर : कोल्हापूरकरांचे स्वप्न असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईनसाठी राज्य शासनाने आपल्या हिश्श्याच्या निधीपैकी पहिला टप्पा म्हणून २१ कोटी २७ लाख ५ हजार रुपयांचा निधी कोल्हापूर महानगरपालिकेस वितरित केला आहे. याबाबतचा शासन निर्णय दि. १५ मे रोजी झाला आहे. केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू राष्टÑीय नागरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत (युआयडीएसएसएमटी) काळम्मावाडी पाईपलाईन योजना राबविण्यात येत आहे. योजना ४२५ कोटी ४१ लाख रुपयांची आहे. त्यापैकी ८० टक्के निधी केंद्र शासन आणि राज्य शासन व कोल्हापूर महानगरपालिका प्रत्येकी १० टक्के निधी देणार आहे. त्यानुसार केंद्र शासनाने पहिल्या टप्प्यातील निधी गेल्या चार महिन्यांपूर्वी दिला आहे. त्या अनुषंगाने केंद्राच्या वितरित निधीच्या प्रमाणात राज्य शासनाचा हिस्सा म्हणून २१ कोटी २७ लाख ५ हजार रुपये इतका निधी आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांनी राखीव करून ठेवलेला होता. त्यानुसार संबंधित निधीच्या रकमेचा धनादेश आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका यांच्याकडे सुपूर्द करावा. तसेच याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करावा, असा आदेश सहायक संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांना शासनाने दिला आहे. राज्य सरकारकडे निवडणुकीपूर्वीच हा निधी आला होता. मात्र, आचारसंहितेमुळे तो वितरीत झाला नव्हता. संबंधित निधी महापालिकेला वितरित करण्याबाबत दि. १५ मे रोजी आदेश दिला आहे. त्यामुळे आता थेट पाईपलाईनचे काम वेग घेणार आहे. (प्रतिनिधी)