शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

घराची कौले काढून शाहूपुरीत १७ हजारांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:18 IST

कोल्हापूर : येथील शाहूपुरीतील घोरपडे गल्लीत बंद घराची कौले काढून अज्ञात चोरट्याने १७ हजारांची घरफोडी केली. चोरट्याने सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर ...

कोल्हापूर : येथील शाहूपुरीतील घोरपडे गल्लीत बंद घराची कौले काढून अज्ञात चोरट्याने १७ हजारांची घरफोडी केली. चोरट्याने सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर हात मारला. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. याबाबत श्रीधर प्रकाश इंगवले (रा. ३८२/ख ई वॉर्ड, घोरपडे गल्ली, चव्हाण पॅसेज) यांनी शाहुपूरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, श्रीधर इंगवले हे खासगी कंपनीत अभियंता म्हणून नोकरीस आहेत. त्यांचा मुलगा रुग्णालयात ॲडमिट आहे. त्यासाठी इंगवले दांपत्य हे मंगळवारी रात्री हॉस्पिटलमध्येच थांबले होते. त्यावेळी घरी कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराची कौले काढून आत प्रवेश केला. आतील रोख रकमेसह सोन्याच्या दोन वाट्या, कानातील डूल, चांदीचे कडे, चांदीचे ब्रेसलेट आदी सुमारे १६ हजार ९०० रुपयेचा ऐवज चोरट्याने लंपास केला. इंगवले हे बुधवारी सकाळी रुग्णालयातून घरी परतल्यानंतर हा चोरी झाल्याचा प्रकार उघडकिस आला. दरम्यान, चोरीची माहिती मिळताच सहा. पो. नि. परशुराम कोरडे यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच डॉगस्कॉटने चोरट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला. याबाबत शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.