शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलांसाठी १५० बेड राखीव ठेवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:23 IST

कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार रविवारी पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व बालरोगतज्ज्ञांची बैठक घेऊन लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग ...

कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार रविवारी पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व बालरोगतज्ज्ञांची बैठक घेऊन लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला तर काय करायचे याचे नियोजन केले. त्यानुसार जुलैमध्ये ही लाट येईल असे गृहीत धरून सीपीआर, आयसोलेशनसह आयजीएममध्ये पहिल्या टप्य्यात १५० बेड राखीव ठेवण्यात येणार आहे. खासगी दवाखान्यांचीही मदत घेतली जाणार आहे.

बैठकीनंतर पालकमंत्री पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार बैठक घेऊन ही माहिती दिली. जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याला सामोरे जाण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दुपारी राज्यभरातील बालरोगतज्ज्ञांशी वेबीनारद्वारे संवाद साधला. त्याला अनुसरून पालकमंत्री पाटील यांनी कोल्हापुरातील बालरोगतज्ञांसमवेत तातडीने बैठक घेतली. प्राथमिक चर्चा झाली, त्यानंतर बुधवारी पुन्हा एकदा सविस्तर बैठक घेण्याचेही यावेळी निश्चित करण्यात आले. लहान मुलांसमवेत उपचार करताना विशेष दक्षता घ्यावी लागते, शिवाय त्यांच्यासोबत पालकांनाही ठेवावे लागणार असल्याने त्यापद्धतीनेच नियोजन केले जाणार आहे. आयसीयू आणि व्हेंटिलेंटरने परिपूर्ण बेड सरकारी दवाखान्यातच उपलब्ध व्हावे म्हणून सीपीआर, आयसोलेशन, आयजीएम येथे व्यवस्था करण्यात येणार आहे.

वयोगटनिहाय वर्गवारी होणार

जिल्ह्यात आजच्या घडीला १८ वर्षांखालील बालकांची संख्या साधारपणे १० लाखांच्या घरात आहे. पण पुढे उपचारात सुसूत्रता यावी म्हणून वयोगटनिहाय वर्गवारी करण्याच्या सूचना पालकमंत्री पाटील यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या. आज, सोमवारीच त्याची यादी तयार होणार आहे. त्यात २ महिने ते ३ वर्षापर्यंतची बालके, ५ वर्षांपर्यंतची, १० वर्षांपर्यंतची आणि १८ वर्षांखालील किती अशी वर्गवारी निश्चित होणार आहे.

टास्क फोर्स ठरवेल तेच उपचार

कोरोनावरील उपचाराच्या बाबतीत ॲलोपॅथी, होमिओपॅथी असा सध्या बराच काथ्याकुट केला जात असलातरी टास्क फोर्सने घालून दिलेल्या प्रोटोकॉलनुसार कोरोनाबाधितावर उपचार होत आहे, त्यात बदल होणार नाही, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

गरज असेल तरच बाहेर पडा

लॉकडाऊन शिथिल झाला असलातरी कोरोना संपलेला नाही. त्यामुळे सूट दिली म्हणून विनाकारण घराबाहेर पडू नका, नियम पाळा, गरज असेल तरच बाहेर पडा, असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले. माझा जीव मीच वाचवणार या जबाबदारीतून कोल्हापूरकरांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करतानाच शंभर टक्के मास्क वापरा. मास्क नाही म्हणून कारवाई होणे हे दुर्दैवी असून कारवाई झाली नाही असा दिवस उगवू दे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

अकराच्या आत घरात

कोरोनाचे आकडे कमी झालेले नसल्यामुळे प्रशासनाने घालून दिलेल्या ७ ते ११ या वेळेचे पालन करा. आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी म्हणून सातच्या आत घरात अशी शपथच जागरूक नागरिक म्हणून प्रत्येकाने घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.