शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

१५ लाखांचा गुटखा जप्त

By admin | Updated: March 25, 2015 00:40 IST

रत्नागिरी पोलिसांची कारवाई : आरोपीवर अजामीनपात्र गुन्हा दाखल

रत्नागिरी : अन्न व औषध प्रशासन, शहर पोलीस व ग्रामीण पोलिसांनी सोमवारी रात्री ११ वाजता रत्नागिरीजवळील मिरजोळे एमआयडीसीतील एका गोदामावर संयुक्तरीत्या धाड टाकली. या कारवाईत तब्बल १५ लाख ३६ हजार १३५ रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी अमन तुषार देवळेकर (२३, धनजीनाका, रत्नागिरी) याच्यावर भारतीय दंडविधान ३२८ अन्वये अजामीनपात्र गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. जप्त गुुटखा ग्रामीण पोलिसांच्या हवाली केला आहे. राज्यात गुटखाबंदीच्या ३२८ कलमान्वये अजामीनपात्र गुन्हा दाखल करून दहा वर्षांची कैद होऊ शकते, असे विधानसभेत सूचित केले होते. हा निर्णय घेतल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात घडलेला हा पहिलाच गुन्हा आहे. गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्याच्या आदेशानुसार रत्नागिरी अन्न व औषध प्रशासनाने सोमवारी रात्री ही धडक कारवाई केली. श्रीराम बॉडी बिल्डिंग सेंटर एमआयडीसी, मिरजोळे, रत्नागिरी जवळील गोदामात हा साठा आढळला. अमन देवळेकर या आरोेपीच्या विरोधात अन्न सुरक्षा अधिकारी (अन्न व औषध प्रशासन, रत्नागिरी) दिनेश ज्ञानेश्वर तांबोळी (वय ३२, रा. शिवाजीनगर, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली असूून, अन्न सुरक्षा कायदा २००६ कलम २६ (२) (आय) सहवाचन, कलम २७ (३) (इ) तसेच कलम २६ (२) (आय. व्ही.) सहवाचन महा. राज्य शासन राजपत्र अधिसूचना ३१/१०६३/२०१४, दि. १५/७/२०१४ शिक्षापात्र कलम ५९ तसेच भारतीय दंडविधान २७२, २७३, १८८, ३२८ (अजामिनपात्र) अन्वये देवळेकर विरोधात गुन्हा दाखल केला. या कारवाईत दिनेश तांबोळी यांच्यासह, राजन साळवी, ग्रामीणचे निरीक्षक महेश थिटे, शहरचे निरीक्षक इंद्रजित काटकर व इतर कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. (प्रतिनिधी)अन्नकडून चार बॅँ्रडचा गुटखा जप्तअन्न औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत चार कंपन्यांचा गुटखा जप्त केला आहे. त्यात सारारचे पावणेदहा लाख किंमतीचे दोन हजार पाऊच, राज कोल्हापूर गुटख्याचे दोन लाख ९० हजार ४०० रुपये किंमतीचे एक लाख ५५ हजार २०० पाऊच, सचिन गुटख्याचे दोन लाख २८ हजार ७३५ रुपयांचे दोन लाख २८ हजार ७३५ पाऊच, आरएमडीचे ४२ हजार रुपये किमतीचे सहा हजार पाऊच यांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही गेल्या वर्षभरात दिडशे दुकानांची तपासणी केली. मात्र, त्यात कुठेही गुटखा विक्री आढळली नसल्याची माहिती अन्न, औषध प्रशासन रत्नागिरी विभागाचे निरीक्षक दिनेश तांबोळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.