शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

ऊसविकास योजनेसाठी १५ कोटी

By admin | Updated: August 11, 2014 00:18 IST

जिल्ह्याला १ कोटी ८४ लाख : दहा कोटी खर्च होणार सूक्ष्म सिंचनावर

प्रकाश पाटील-कोपार्डे -- राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत ऊस विकास कार्यक्रमातून ऊस विकास योजनेसाठी १५ कोटी २९ लाख ४ हजार रुपयांना मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी उसातील सूक्ष्म सिंचनासाठी १० कोटी २० लाख २५ हजार खर्च करण्यात येणार आहेत. त्यामुळे उसाकरिता पाणी वापर अधिक कार्यक्षमपणे होण्यास मदत होणार आहे.राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून राज्यातील २३ जिल्ह्यांमध्ये सुमारे १३ कोटी ३१ लाख ८४ हजार रुपयांची तरतूद केली आहे. ही तरतूद सूक्ष्म सिंचन आंतरपीक, प्रात्यक्षिके, उती संवर्धन रोपे आणि अधिकारी प्रशिक्षण यांसाठी केली आहे. यंदा प्रथमच उसाचे १ हजार ८५५ हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. त्यासाठी कृषी विभाग १० कोटी २० लाख २५ हजार रुपये उपलब्ध करून देणार आहे. त्यामध्ये उसासाठी सूक्ष्म सिंचन बसविलेल्या प्रतिलाभार्थ्याला हेक्टरी ५५ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे; तर उसात आंतरपीक व उसाच्या एक डोळा पद्धतीच्या लागवडीचे राज्यात ३७१ प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. ३ हजार ७१० प्रात्यक्षिकेही घेण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण २ कोटी ९८ लाख ८० हजार रुपये मंजूर केले आहेत. एक प्रकल्प दहा हेक्टरचा असून, हेक्टरी आठ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. राज्यस्तरीय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी एक लाख ६० हजार रुपये मंजूर केले आहेत.राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाअंतर्गत १ कोटी ९७ लाख २० हजार रुपये मंजूर केले आहेत. हा कार्यक्रम फक्त मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या आठ जिल्ह्यांत राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत आंतरपीक व एक डोळा लागवडीचे २०९ प्रकल्प हाती घेणार आहेत. त्यासाठी एकूण १ कोटी ६७ लाख २० हजार रुपये मंजूर केले आहेत. यामध्ये लाभार्थ्याला आठ हजार रुपयांचे अनुदान, उसाच्या लागवडीसाठी उती संवर्धनांतर्गत आठ लाख रोपे लागवडीसाठी देणार आहेत. हेक्टरी प्रतिलाभार्थ्याला साडेतीन रुपये प्रतिरोपाप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. राज्यस्तरीय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी दोन लाख रुपये मंजूर केले आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यासाठी १ कोटी ८४ लाख रुपये मंजूर झाले असून, सर्वांत जास्त सोलापूर जिल्ह्यासाठी १ कोटी १८ लाख ३५ हजार मंजूर झाले आहेत. नाशिक- ५६ लाख ४५ हजार, धुळे - १२ लाख २५ हजार, नंदुरबार- २२ लाख ९० हजार, जळगाव- २२.९०, नगर १ कोटी ६१ लाख १० हजार, पुणे - १ कोटी ५३ लाख २० हजार, सोलापूर - २ कोटी १८ लाख ३५ हजार, सातारा - ९५ लाख १५ हजार, सांगली- ९९ लाख ५० हजार, कोल्हापूर - १ कोटी ८४ लाख, औरंगाबाद - २४ लाख ७५ हजार, जालना - २० लाख, बीड - ६० लाख ५० हजार, लातूर - ५२ लाख २५ हजार, उस्मानाबाद - ४९ लाख ५० हजार, नांदेड - २४ लाख ७५ हजार, परभणी - १९ लाख २५ हजार, हिंगोली - ११ लाख, यवतमाळ - ११ लाख ४५ हजार, वर्धा - ४ लाख ३५ हजार, नागपूर - ३ लाख ५५ हजार, भंडारा - ३ लाख ५५ हजार, गोंदिया - ४ लाख ३५ हजार.‘राष्ट्रीय अन्नसुरक्षा’अंतर्गत जिल्हानिहाय मंजूर रक्कमऔरंगाबाद - १२ लाख, जालना - ८ लाख, बीड - २० लाख, लातूर - ४५ लाख ६० हजार, उस्मानाबाद - ३२ लाख, नांदेड - २१ लाख ६१ हजार, परभणी - १९ लाख २० हजार, हिंगोली - १२ लाख ८० हजार.