शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
4
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
5
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
6
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
7
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
8
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
9
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
10
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
11
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
12
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
13
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
14
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
15
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
16
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
17
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
18
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
19
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
20
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी

जिल्ह्यातील १२,१६६ गर्भवती अशक्त

By admin | Updated: April 13, 2015 00:01 IST

आरोग्य तपासणी अभियान : २८४ गर्भवतींचे हिमोग्लोबिन सातपेक्षा कमी, लोहयुक्त गोळ्यांचा डोस

भीमगोंडा देसाई- कोल्हापूर - आरोग्य विभागाने महिला आरोग्य तपासणी अभियानात केलेल्या ३० वर्षांवरील महिलांच्या तपासणीत जिल्ह्यातील १२ हजार १६६ गर्भवती अशक्त असल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय २८४ गर्भवती अतिअशक्त असल्याचे पुढे आले आहे. सधन समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील गर्भवतींच्या आरोग्याची ही परिस्थिती चिंताजनक मानली जात आहे.जिल्ह्यातील शासकीयरुग्णालय, प्राथमिक व उपकेंद्राच्या माध्यमातून गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एकूण १५ हजार ५१ गर्भवतींची तपासणी झाली. त्यातील १२ हजार १६६ गर्भवतींचे हिमोग्लोबिन ११ ग्रॅमपेक्षा कमी आणि २८४ गर्भवतींचे सात ग्रॅमपेक्षा कमी आहे. सातपेक्षा कमी हिमोग्लोबिन असलेल्या गर्भवतींना आरोग्य विभागाने जोखमीचे ठरविले आहे.गर्भवती महिलेस स्वत: व बाळाच्या सुदृढतेसाठी परिपूर्ण आहाराची आवश्यकता असते. त्यामुळे आरोग्य विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून ११ ग्रॅमपेक्षा कमी हिमोग्लोबिन असलेल्या गर्भवतींना गर्भधारणेपासून तीन महिन्यांनंतर १०० दिवस दोन याप्रमाणे आणि ११ पेक्षा अधिक असलेल्या गर्भवतींना लोहयुक्त गोळ्या मोफत दिल्या जातात. मात्र, ग्रामीण भागातील बहुतांश गर्भवती सकस आहाराबाबत अनभिज्ञ असतात. अल्पशिक्षित असल्यामुळे आरोग्याबाबत त्या फारशा सतर्क राहत नाहीत. त्यामुळे गर्भधारणेच्या अवस्थेत परिपूर्ण आहार आणि लोहयुक्त गोळ्याकडे त्या दुर्लक्ष करतात. परिणामी त्या अशक्त होतात.हिमोग्लोबिनचे प्रमाण ११ पेक्षा कमी येते. बाळाची वाढ चांगली होत नाही. संबंधित गर्भवतीची प्रकृती खालावते. परिणामी प्रसूतीवेळी ती महिला किंवा बाळ यांंच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आरोग्य प्रशासन, आरोग्य सेविका, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका यांच्यातर्फे गर्भवतींचा नियमित सर्व्हे करून समुपदेशन व लोहयुक्त गोळ्या पुरविल्या जात आहेत. आरोग्य तपासणीनंतर नेमकेपणाने अशक्त गर्भवतींची संख्या समोर आल्यामुळे आरोग्य विभागाने त्वरित व्यापक उपाययोजनांचे नियोजन केले आहे.जिल्ह्यातील आकडेवारी..तालुकातपासणी११ ग्रॅमपेक्षा कमी सात ग्रॅमपेक्षाकेलेल्या गर्भवतीहिमोग्लोबिनकमी हिमोग्लोबिनआजरा९४९९३०१९ भुदरगड५०६४१६११चंदगड१६२७१५९७३०गडहिंग्लज७३२७१७१५गगनबावडा२५८२८७१२हातकणगंले१७९२१२७९२०करवीर१८९५१६६१४कागल१०३७१०११२६पन्हाळा१३४१११२५२० राधानगरी९३१९००११शाहूवाडी९८४७२३९शिरोळ२९९९१५२०१२हिमोग्लोबिन ११ ग्रॅमपेक्षा कमी असलेल्या गर्भवतींना रोज दोन लोहयुक्त गोळ्या दिल्या जात आहेत. सातपेक्षा कमी हिमोग्लोबिन असलेल्या गर्भवतींना शिरेतून लोहाचा डोस दिला जात आहे. - डॉ. आर. एस. आडकेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी.