शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

‘आयजीएम’साठी ११ कोटींची तरतूद

By admin | Updated: July 2, 2016 00:39 IST

सुरेश हाळवणकर : कर्मचाऱ्यांचे आरोग्य विभागाकडे समावेशन

इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलच्या हस्तांतरणाचा शासन निर्णय निर्गमित झाला असून, त्यासाठी ११ कोटी रूपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. तसेच हॉस्पिटलमधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांची शासनाच्या आरोग्य विभागाकडे समावेशन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. मंत्रिमंडळाच्या २१ जून २०१६ रोजी झालेल्या बैठकीत आयजीएम हॉस्पिटल आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार इचलकरंजी नगरपरिषदेचे हे हॉस्पिटल या रुग्णालयाच्या मालकी हक्कासह संबंधित भूखंड व त्यावरील इमारती आणि त्यामधील यंत्रसामग्रीसह ( आर्थिक दायित्व वा बोजाविरहित) सार्वजनिक आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे, तर हॉस्पिटलमधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडील समावेशन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच रुग्णालयातील वैद्यकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा नगरपरिषदेच्या अन्य प्रयोजनार्थ उपयोगात आणता येत असल्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना नगरपालिकेच्या सेवेत समाविष्ट होण्याचा विकल्प देण्यास मान्यता देण्यात आली आहे. हस्तांतरणाच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांच्या समावेशनाबाबत विकल्प मागवून पुढील कार्यवाही सार्वजनिक आरोग्य विभागाने ६ महिन्यात करावी, त्याअनुषंगाने ६ महिन्यापर्यंत वेतनाची अदायगी नगरपरिषदेने करण्यास व ६ महिन्यानंतर वेतनाची अदायगी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. हस्तांतरणानंतर रुग्णालयावरील संपूर्ण खर्च सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यास व त्यासाठी आवश्यक ती अर्थसंकल्पीय तरतूद करण्यास मान्यता देण्यात आली आहे. रुग्णालयाचे शासनाकडे हस्तांतरण झाल्यानंतर त्या अनुषंगाने नगरपरिषदेकडील जेवढा कर्मचारी वृंद शासनाकडे वर्ग होईल, त्या प्रमाणात नगरपारिषदेला अनुज्ञेय सहायक अनुदानाची पुनर्रचना करण्यास मान्यता देण्यात आली आहे.यावेळी शहर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अजित जाधव, भाजपा शहर अध्यक्ष शहाजी भोसले, नगरसेवक तानाजी पोवार, सयाजी चव्हाण, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)कार्यवाहीसाठी समितीची स्थापनारूग्णालयाची हस्तांतरणाची कार्यवाही वेळेत पूर्ण होण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांचे समावेशन करण्यासाठी जिल्हाधिकारी कोल्हापूर आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे क्षेत्रीय अधिकारी यांची समिती स्थापन केली असून, मुख्याधिकारी यांनी सर्व माहिती व आवश्यक प्रक्रिया २ महिन्यांत पूर्ण करावयाची आहे. त्यामुळे हे हॉस्पिटल लवकरच शासनाकडे हस्तांतरित होऊन उच्च दर्जाच्या वैद्यकीय उपचार सेवा पुरविणे साध्य होणार आहेत, अशी माहिती हाळवणकर यांनी दिली.