शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

माथेरान नगरपरिषदेचे १० शिवसेनेचे नगरसेवक भाजपमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:19 IST

कोल्हापूर : रायगड जिल्ह्यातील माथेरान नगरपरिषदेच्या शिवसेनेच्या १० नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ...

कोल्हापूर : रायगड जिल्ह्यातील माथेरान नगरपरिषदेच्या शिवसेनेच्या १० नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये येथे भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे नगराध्यक्ष जरी शिवसेनेचा असला तरी त्यांनी बहुमत गमावले आहे. यावेळी माजी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते.

या नगरपरिषदेमध्ये १७ पैकी १४ नगरसेवक हे शिवसेनेचे आहेत. त्यातील दहा सदस्य आणि प्रमुख पदाधिकारी यांचे पाटील यांनी भाजपचा स्कार्फ घालून, गुलाबपुष्प देवून स्वागत केले. या सर्वांचा भाजपमध्ये सन्मान केला जाईल, असे पाटील यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, माजी मंत्री, आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नियोजनाप्रमाणे कोकणात भाजपची घोडदौड सुरू आहे.

आमदार रवींद्र चव्हाण म्हणाले, भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक काम करण्याची पद्धत, लोकांना मिळणारा सन्मान लक्षात घेवून या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आगामी काळात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली माथेरान येथे पक्षप्रवेशाचा मोठा कार्यक्रम घेतला जाईल. याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे उपस्थित होते.

यावेळी उपनगराध्यक्ष कन्हैया चौधरी, समित्यांचे सभापती व नगरसेवक राकेश नरेंद्र चौधरी, संदीप कदम, सोनम दाभेकर, प्रतिभा घावरे, रूपाली आरवाडे, सुषमा जाधव, प्रियांका कदम, ज्योती सोनावळे, चंद्रकांत जाधव यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

२७०५२०२१ कोल बीजेपी ०१

माथेरान नगरपरिषदेच्या शिवसेनेच्या दहा नगरसेवकांसह विविध पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी कोल्हापूर येथे भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी माजी मंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार प्रशांन ठाकूर उपस्थित होते.