शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

कागलमधील १० शाळा ‘आयएसओ’च्या यादीत

By admin | Updated: January 18, 2016 00:26 IST

पंचायत समिती शिक्षण विभाग प्रयत्नशील : १०० हून अधिक शाळांत ज्ञानरचनावाद उपक्रम

रमेश वारके-- बोरवडे कागल तालुका शैक्षणिक, आर्थिक दृष्टीने समृद्ध व्हावा, यासाठी तालुक्याच्या शैक्षणिक जागृतीसाठी पंचायत समिती शिक्षण विभागाची विशेष धडपड सुरू आहे. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १० शाळा आय.एस.ओ. मानांकन शैक्षणिक गुणवत्ता यादीत आहेत, तर जिल्हा परिषदेच्या १२२ शाळांपैकी १०० हून अधिक शाळांत ज्ञानरचनावाद उपक्रम सुरू आहे. कागलची ही शैक्षणिक धडपड सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या जीवनात सरस्वतीच्या विणेची झंकार पोहोचविणारी आहे. कागलचे गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत बोडरे व सर्व विस्तार अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. शिक्षक शाळेसाठी व मुलांच्या ज्ञानासाठी ज्या सेवा देतो, त्या सेवेचे मूल्यमापन म्हणून आय.एस.ओ. मानांकन प्रमाणपत्र दिले जाणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेकडे बघण्याचा पालकांचा दृष्टिकोन बदलेल. आय.एस.ओ. मानांकनामुळे शैक्षणिक विश्वासार्हता जोपासण्यास सहकार्य मिळणार असून, जादा वेळ न जाता गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे. ज्ञानरचनावादामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना मिळणार असून, कागल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार तालुक्यातील अनेक शिक्षक व शिक्षिकांनी ज्ञानरचनावाद उपक्रम समजावून घेण्यासाठी व तो आपल्या शाळेत राबविण्यासाठी सातारा जिल्ह्यातील कुमठे बीट ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन ज्ञानरचनावाद संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे. आय.एस.ओ. मानांकनात केंद्र शाळा बिद्री, सोनाळी, फराकटेवाडी, केनवडे, गलगले, व्हन्नूर, अर्जुनवाडा, हमीदवाडा, कासारी, मळगे खुर्द या जिल्हा परिषद शाळांचा समावेश आहे. सलग तीन वर्षे या शाळांचे मूल्यमापन होणार आहे.जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता वाढणारआय.एस.ओ. मानांकनामुळे जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा पालकांचा दृष्टिकोन बदलून गुणवत्ता सुधारण्यास व विद्यार्थी संख्या वाढण्यास मदत होईल. शाळात ज्ञानरचनावाद उपक्रम राबविला जात आहे. विद्यामंदिर दत्तनगर ही छोटी शाळा ज्ञानरचनावादाचा आदर्श नमुना सांगता येईल.