शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

पत्रीपुलाच्या पोहोच रस्त्याचे काम लवकरच मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 23:42 IST

आयुक्तांकडून कामाची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण-ठाकुर्ली रेल्वेमार्गाला समांतर असलेल्या व पत्रीपुलाला जोडणाऱ्या पोहोच रस्त्याचे काम पूर्ण होत आले आहे. मागील पाच वर्षे रखडलेल्या या १०० मीटर रस्त्याचे काम आठवडाभरात पूर्ण होईल, अशी माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.सूर्यवंशी यांनी बुधवारी या रस्त्याची पाहणी केली. याप्रसंगी साहाय्यक संचालक नगररचनाकार मा. द. राठोड, शहर अभियंत्या सपना कोळी-देवनपल्ली, कार्यकारी अभियंता जगदीश कोरे उपस्थित होते. ठाकुर्लीतील म्हसोबानगर ते पत्रीपुलापर्यंत २.२ किलोमीटर लांब व २४ मीटर रुंद रेल्वे समांतर रस्ता आहे. त्यापैकी १०० मीटर रस्त्याचे काम भूसंपादनाअभावी रखडले होते.

पत्रीपुलाचा ७०० टन वजनाचा गर्डर टाकण्याच्या दिवशी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पोहोच रस्ता झालाच नाही, तर पत्रीपुलाचे काम पूर्ण होऊन उपयोग नाही. त्यामुळे आधी हा रस्ता पूर्ण करा, अशी मागणी केली होती. आयुक्तांच्या भेटीदरम्यान पाटील यांनी रस्तेबाधितांना न्याय देण्याचीही मागणी केली होती. त्यानंतर शिवसेनेचे परिवहन सभापती मनोज चौधरी यांनी पोहोच रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याचे स्पष्ट करीत युद्धपातळीवर ते पूर्ण केले जाईल, असे सांगितले होते. पत्रीपुलाच्या कामाची पाहणी दोन दिवसांपूर्वी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली होती. त्या वेळी काम अंतिम टप्प्यात असून, पूल वाहतुकीसाठी लवकरच खुला होईल, असे स्पष्ट केले होते.

वेळ, इंधनाची होणार बचतपत्रीपुलाच्या पोहोच रस्त्याच्या कामाची पाहणी सूर्यवंशी यांनी बुधवारी केली. या वेळी त्यांनी हा रस्ता आठवडाभरात पूर्ण होईल. त्यामुळे या रस्त्याद्वारे कल्याण-डोंबिवलीला ठाकुर्लीतील रेल्वे समांतरमार्गे प्रवास करता येईल. त्यामुळे प्रवाशांचा वेळ व इंधनाचीही बचत होईल, असे सूर्यवंशी यांनी सांगितले.

 

टॅग्स :kalyanकल्याण