शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

सहव्याधी असलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 00:37 IST

केडीएमसीकडे लसीकरणानंतर त्रास झाल्याची तक्रार नाही

मुरलीधर भवारलोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण-डोंबिवली मनपास राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून आतापर्यंत २१ हजारांपेक्षा जास्त कोरोना लसीचे डोस मिळाले आहेत. मनपाच्या आरोग्य विभागाकडून सध्या लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू असून, त्यात ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांवरील सहव्याधी असलेल्यांना लस दिली जात आहे. आतापर्यंत झालेल्या लसीकरणानंतर एकाही ज्येष्ठ नागरिकाने त्रास झाल्याची तक्रार मनपाकडे केलेली नाही. लसीकरणानंतर त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने ज्येष्ठ व सहव्याधी असलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने लस घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.  

केडीएमसीने पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, कर्मचारी यांना लस दिली. तर, दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्करसाठी लसीकरण सुरू झाले. तिसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक व सहव्याथी असलेल्यांसाठी मनपा रुग्णालयात मोफत तर, खासगी रुग्णालयात शुल्क आकारून लस दिली जात आहे. सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लागण लवकर होते. त्यामुळे त्यांना कोविड आणि नॉनकोविड रुग्णलयात उपचार घेणे जिकिरीचे झाले होते. कोरोनापासून बचावासाठी त्यांना तातडीने लस देण्याची मागणी केली जात होती. 

काय म्हणतात तज्ज्ञ...

उपचार सुरू असलेल्या सहव्याधी रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यांनीच लस घ्यावी. रक्ताच्या गुठळ्या होणाऱ्यांना रक्त पातळ करण्याच्या गोळ्या दिल्या जातात. त्यामुळे अशा रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. - डॉ. नितीन बोटकोंडले, फिजीशियन

डायलिसीसच्या रुग्णांचे रक्त पातळ करावे लागते. ज्यांचे डायलिसीस नुकतेच झाले आहे, त्यांनी लगेस लस घेऊ नये. अन्यथा त्यांना इन्फेक्शन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. - डॉ. नितीन भोसले, मूत्रविकार तज्ज्ञ 

हृदयविकाराचे रुग्ण हे वयोवृद्ध असतात.  रक्त पातळ करण्याच्या गोळ्या सुरू असतात. ज्यांना औषधे, गोळ्या, इंजेक्शनची ॲलर्जी असेल त्यांनी लस घेण्याचे टाळावे. हृदयात व्हॉल्व बसविलेल्यांनी रक्ताची चाचणी करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोरोनाची लस घ्यावी.    - डॉ. नितीन पाटील, हृदयरोग तज्ज्ञ 

लस घेण्यापूर्वी मधुमेही रुग्णांनी त्यांच्या शरीरातील साखर नियंत्रणात असेल त्यावेळीच लस घ्यावी. लस घेतल्यावर आराम करावा.     - डॉ. एस. एन. कुलकर्णी,     मधुमेह तज्ज्ञ

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसkalyanकल्याण