शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

लोढा यांच्या डोक्यात खुर्ची मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 03:23 IST

अलिबाग-विरार कॉरिडॉरच्या जमीन मोजणीस विरोध

कल्याण : अलिबाग-विरार कॉरिडॉर प्रकल्पात बाधित होणाऱ्या प्रकल्पबाधितांचा प्रकल्पास विरोध आहे. या प्रकल्पासाठी शुक्रवारी जमीन मोजणी केली जाणार होती. या प्रकल्पात एका विकासक कंपनीचे संचालक असलेल्या राजेंद्र लोढा यांच्या कंपनीची जमीन बाधित होत असल्याने ते त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यावेळी विरोध करणाऱ्यांपैकी एकाने त्यांच्या डोक्यात खुर्ची घालण्याचा प्रयत्न केला,  तसेच त्यांच्या अंगावर धावून गेला. त्याचबरोबर, युवामोर्चाच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी जमीन मोजणीस विरोध करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपाखील पाच जणांविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रकल्पात कंपनीची जमीन बाधित होत असल्याने लोढा आणि कल्याण भूमिअभिलेख कार्यालयाने शुक्रवारी सर्वेक्षण आयोजित केले होते. त्याच्याशी संबंध नसलेले लोकही त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी या सर्वेक्षणाला विरोध केला. यावेळी वादंग होऊन सावन पाटील उर्फ भगत यांनी लोढा यांच्या अंगावर धावून जात त्यांच्या डोक्यात खुर्ची घालण्याचा प्रकार घडला, तसेच अन्य गजानन पाटील, प्रेमनाथ पाटील, विकी पाटील आणि फकिरा काळण यांनी जमीन मोजणीस विरोध करून जमीन मोजणी होऊ दिली नाही. या प्रकरणी लोढा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.दाेन दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांची बैठक प्रकल्पबाधितांना योग्य दराने मोबदला दिल्याशिवाय प्रकल्पासाठी जमिनीची मोजणी करू नये, या मागणीकरिता युवामोर्चाने दोन दिवसांपूर्वीच हेदुटणे गावात बैठक घेतली होती.  त्या बैठकीत युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मोजणीस विरोध करून मोजणी उधळून लावली जाईल, असा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे.पाच जणांविरोधात  गुन्हा दाखल यावेळी वादंग होऊन सावन पाटील यांनी लोढा यांच्या  डोक्यात खुर्ची घालण्याचा प्रयत्न केला. तसेच या वेळी गजानन पाटील, प्रेमनाथ पाटील, विकी पाटील, फकिरा काळण यांनी जमीन मोजणीस विरोध केला. nया प्रकरणी लोढा यांच्या  तक्रारीनुसार पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.