शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण पूर्वेत वाजले स्वच्छतेचे तीनतेरा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 00:12 IST

चार दिवसांपासून कचरा पडून : आरोग्याचा प्रश्न गंभीर 

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : एकीकडे केडीएमसीच्या घंटागाड्या वेळेवर येत नसल्याने ठाकुर्लीतील गृहसंकुलांच्या बाहेर तसेच रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचत असतानाच आता कल्याण पूर्वेतील सूचकनाका परिसरातही स्वच्छतेचे तीनतेरा वाजत असल्याचे पाहायला मिळत आहे. कल्याण पूर्वेत कचरा उचलण्यासाठी केडीएमसीने कंत्राटदार नेमला आहे. परंतु, चार दिवसांपासून येथील कचरा उचलण्यात आला नसल्याचे रहिवाशांनी सांगितले.

केडीएमसीने १० पैकी ‘ब’, ‘क’, ‘ड’ आणि ‘जे’ या चार प्रभागांतील कचरा संकलनासाठी कंत्राटदार नेमला आहे. परंतु, पूर्वेतील ‘जे’ प्रभागातील सूचकनाका परिसरातील नेतिवली टेकडी, महात्मा फुले नगरमधील कचरा दररोज उचलला जात नसल्याच्या तक्रारी रहिवाशांनी केल्या आहेत. महापालिकेकडे तक्रार करूनही कचरा पडून राहत आहे. चार दिवसांपासून कंत्राटदाराचे कामगार कचरा उचलण्यासाठी फिरकले नसल्याने कचऱ्याचे ढीग मोठ्या प्रमाणात साचले आहेत.

कचरा कुजल्यामुळे परिसरातील रहिवासी दुर्गंधीने त्रस्त झाले आहेत. पायाखाली कचरा तुडवत अस्वच्छतेमधूनच नाक मुठीत धरून त्यांना ये-जा करावी लागत आहे. ही अस्वच्छता आजारांनाही आमंत्रण देत आहे. तसेच कचऱ्यामुळे परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रवही वाढला आहे. हा कचरा त्यांनी रस्त्यावर पसरवला आहे. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याचे आवाहन करणाऱ्या महापालिकेचे कंत्राटदाराच्या कामाकडे दुर्लक्ष झाल्याने ही परिस्थिती ओढावल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

उपायुक्तांकडून प्रतिसाद नाहीकेडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून शून्य कचरा मोहिमेंतर्गत चांगले उपक्रम राबविले जात आहेत. परंतु, दररोज कचरा उचलण्याबाबत होत असलेली हलगर्जी चर्चेचा विषय ठरला आहे. यासंदर्भात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.