शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

लायसन्सच्या कामासाठी येणाऱ्यांची होतेय गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 23:59 IST

कल्याण आरटीओतील स्थिती; फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा, सुविधांचीही वानवा

- अनिकेत घमंडीडोंबिवली : कोरोनामुळे कल्याण आरटीओचे कामकाज तीन महिने ठप्प होते. जूननंतर त्याला सुरुवात झाली खरी, परंतु सप्टेंबरपर्यंत कार्यालयात पुरेसे कर्मचारी येत नसल्याने कामात अडथळे आले. त्यानंतर शासन नियमानुसार कामाला सुरुवात झाली. तीन महिन्यांत ३३ हजारांहून अधिक अर्जदारांना लर्निंग लायसन्स दिल्याचा दावा उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी तानाजी चव्हाण यांनी केला आहे. दरम्यान, आरटीओ कार्यालयात विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक येतात, पण सध्या तेथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे.    कल्याण आरटीओमध्ये कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर, टिटवाळा, मुरबाडपासूनचे नागरिक लर्निंग लायसन, पक्के लायसन्स, वाहननोंदणी व अन्य कामांसाठी येतात. मात्र, येथे नागरिकांना उभे राहायला शेड नाही. प्रचंड धूळ व अस्वच्छता आहे. पिण्याच्या पाण्याची सोय असून नसल्यासारखी आहे. प्रसाधनगृह व आसन व्यवस्था पुरेशी नाही. त्यामुळे नागरिकांची प्रचंड अडचण होत आहे.   लर्निंग लायसन्ससाठी येणाऱ्यांना ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर टोकन क्रमांक मिळतो, पण त्यानुसार नंबर लागतोच असे नाही, अशी टीका काही त्रस्त नागरिकांनी केली.      दलालांचा विळखा ही समस्या या कार्यालयाला आहे. पण लर्निंग लायसन्सच्या ठिकाणी मात्र टोकन पद्धत व ठरावीक वेळ ठरवून देण्यात आल्याने प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जात असल्याचे दिसते.नागरिक ताटकळतातलर्निंग लायसन्ससाठी संगणकाद्वारे परीक्षा घेतली जाते. मात्र, परीक्षा हॉलमध्येही सुविधा नाहीत. केंद्राबाहेर नागरिक ताटकळतात. त्यात जर टोकन नंबर येऊन गेला तर मात्र पुन्हा वेळ, नंबर येण्यासाठी वाट बघावी लागते. दिवसाला सुमारे ५०० नागरिकांना टोकन देऊन लर्निंग लायसन्स दिले जाते. तर, महिन्याला सुमारे ११ हजार आणि विशेष कॅम्पद्वारे एक हजार लर्निंग लायसन्स दिल्याचे सांगण्यात आले.खिडक्यांचा घोळ संपता संपत नाहीकल्याण आरटीओ कार्यालयास दलालांचा फारसा विळखा नसला तरी खिडक्यांचा घोळ संपत नाही. त्यामुळे नागरिकांना नेमके कोणत्या खिडकीवर जायचे, हे समजत नसल्याने गोंधळात आणखी भर पडत असल्याचे दिसून आले. वर्षानुवर्षे अशीच अवस्था असून, त्या कामात सुसूत्रता कधी येणार, असा सवाल करत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.बिर्ला कॉलेजवळील आरटीओ कार्यालय अपुरे पडत आहे. आधारवाडी जेल परिसरातील नवीन जागेत नागरिकांसाठी शेड, आसन, पाणी व प्रसाधनगृहाची चांगली सुविधा असेल. अपुरे मनुष्यबळ असले तरी, सगळे झपाट्याने काम करत आहेत.     -तानाजी चव्हाण, आरटीओ अधिकारी