शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवलीत कोविड लसीकरणाचा ड्राय रन यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 01:25 IST

दोन आरोग्य केंद्रांत रंगीत तालीम : २० लाभार्थ्यांना पाठविले मेसेज

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कल्याण-डोंबिवली महापालिकेतर्फे शुक्रवारी कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी आणि डोंबिवलीतील पाटकर आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणाची ड्राय रन घेण्यात आली.

लसीकरण कशा प्रकारे करण्यात येईल, याची पूर्व तयारी म्हणून ही रंगीत तालीम मार पडली. त्यामुळे लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढीस लागणार आहे. केडीएमसीने २० लाभार्थी तयार करून त्यांना लसीकरणाच्या रंगीत तालमीसाठी मेसेज पाठविला होता, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी यावेळी दिली.निवडणूक पॅटर्नप्रमाणे कोविड लसीकरणाचा प्रक्रिया राबविली जाणार आहे. लसीकरणासाठी प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षक कक्ष याची रचना तयार करण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्यात सरकारी व खासगी डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यानंतर, दुसऱ्या टप्प्यात पोलीस, सुरक्षारक्षक आणि तिसऱ्या टप्प्यात वयोवृद्ध आणि व्याधी ग्रस्त लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर टप्प्याटप्प्याने दररोज १०० लाभार्थ्यांचे लसीकरण केले जाणार आहे.

ड्राय रनच्या वेळी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी पाटील, डॉ.वैशाली काशीकर, डोंबिवलीचे उपायुक्त सुधाकर जगताप, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ.प्रतिभा पानपाटील, डॉ. समीर सरवणकर आदी उपस्थित होते. जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ.किशोर चव्हाण यांनी ड्राय रनच्या वेळी नागरी केंद्रांना भेटी देऊन पाहणी करत समाधान व्यक्त केले.

उल्हासनगरमध्ये ड्राय रनकडे लोकप्रतिनिधींची पाठnउल्हासनगर : महापालिका आरोग्य केंद्रात लसीकरणाचा ड्राय रन वैद्यकीय अधिकारी डॉ.दिलीप पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. आयुक्त डॉ.राजा दयानिधी यांनी आरोग्य केंद्राचा आढावा घेतला. शुक्रवारी झालेल्या ड्राय रनबाबत आरोग्य कर्मचारी व नागरिकांत उत्सुकतेचे वातावरण होते.  महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृहनेते, विरोधीपक्ष नेते, प्रभाग समिती सभापती यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ड्राय रनकडे पाठ फिरविली होती.

nलसीकरणासाठी प्रतीक्षा, लसीकरण आणि निरीक्षक कक्ष अशी रचना तयार करण्यात आली आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर नोंदणी केलेल्या लाभार्थींचे टप्प्याटप्प्याने लसीकरण केले जाणार आहे. ड्राय रनच्या वेळी डॉ.पगारे, डॉ.राजा रिजवानी यांच्यासह सहकारी डॉक्टर उपस्थित होते. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका