शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गाडी ते टिटवाळा टप्पा होणार पावसाळ्यापूर्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 00:43 IST

रिंगरोड प्रकल्प : आयुक्तांची माहिती, कामाची केली पाहणी; एमएमआरडीएचे अधिकारी हजर

कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी हाती घेतलेल्या रिंगरोड प्रकल्पाच्या दुर्गाडी ते टिटवाळादरम्यानचे काम येत्या पावसाळ्य़ापूर्वी पूर्ण केले जाईल, अशी माहिती केडीएमसीचे आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.सूर्यवंशी यांनी एमएमआरडीएचे अधिकारी जयवंत ढाणे, सहायक संचालक नगररचनाकार मा. द. राठोड, शहर अभियंत्या सपना देवपनपल्ली-कोळी यांच्यासमवेत प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. यावेळी प्रकल्पाच्या कामातील अडचणी सूर्यवंशी यांनी जाणून घेतल्या.दुर्गाडी ते टिटवाळादरम्यानचा रिंगरोड प्रकल्पाचा टप्पा पावसाळ्य़ापूर्वी पूर्ण केला जाईल, तसेच डोंबिवलीतील कोपर उड्डाणपूल आणि आंबिवली येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. पत्रीपुलाच्या पोहोच रस्त्याचे काम प्रगतिपथावर असून, हे कामही लवकर पूर्ण केले जाणार आहे. सध्या दुर्गाडी खाडी पुलावरील सहा पदरी पुलाचे काम सुरू आहे. त्याच्या तीन मार्गिका पावसाळ्यापूर्वी वाहतूकीसाठी खुल्या केल्या जातील. या पुलांसह रिंगरोडच्या कामाची आता गती दिल्याचे सूर्यवंशी यांनी यावेळी स्पष्ट केले.‘पर्यावरणपूरक कामावर भर’ढाणे यांनी सांगितले की, ‘काही ठिकाणी प्रकल्पासाठी ३५ मीटर रुंदी हवी आहे. तेथे १० मीटरच रस्ता कामाकरिता उपलब्ध आहे. त्यात काय अडचणी आहे, असे किती स्पॉट आहेत. हे जाणून घेतले. रिंगरोड हा उत्तम टिकावा, यासाठी काम कशा पद्धतीने केले जात आहे, त्याची माहिती दिली गेली. रिंगच्या बाजूला उल्हास नदी असल्याने या रस्त्यासाठी मातीचा भराव टाकून रस्ता केला आहे. रस्त्यावर पाणी येऊ नये, तसेच रस्त्याच्या बाजूला पाणी साठले, तरी त्याचा निचरा व्हावा, याची काळजी घेतली आहे. पर्यावरणपूरक काम करण्याचा प्रयत्न केला आहे.’