शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जुने कपडे संकलन मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 00:22 IST

एका दिवसात चार टन कपडे जमा करण्यात आल्याची माहिती केडीएमसीचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी दिली.

कल्याण  : कल्याण-डोंबिवली महापालिका आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी प्लास्टिक व जुने कपडे संकलन मोहीम राबवली जाणार आहे. रविवारी पहिल्याच दिवशी कपडे संकलन मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कल्याण-डोंबिवलीतील आठ केंद्रांवर ही मोहीम पार पडली. एका दिवसात चार टन कपडे जमा करण्यात आल्याची माहिती केडीएमसीचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी दिली.केडीएमसीच्या वतीने सध्या ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण केले जात आहे. नागरिकांकडून सुका कचरा देताना कापड, प्लास्टिक, फर्निचर, काच एकत्रित दिले जाते. त्यामुळे या सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करताना अडचणी येतात. या  पार्श्वभूमीवर महिन्याच्या प्रत्येक रविवारी विशेष मोहीम सामाजिक संस्थांच्या सहकार्याने महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात आली आहे. महिन्याचा पहिला रविवार ई-कचरा, दुसऱ्या रविवारी प्लास्टिक आणि जुने कपडे, तिसऱ्या रविवारी काच, तर चौथा रविवार फर्निचर संकलन करण्यासाठी ठरवण्यात आला आहे. महिन्याच्या दुसऱ्या रविवारी राबवण्यात आलेल्या कपडे संकलन मोहिमेला चांगला प्रतिसाद लाभला. सकाळी १० ते दुपारी १ दरम्यान ही मोहीम राबवण्यात आली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.कापडी पिशव्या तयार करणारप्लास्टिक संकलनाला फारसा प्रतिसाद लाभला नसल्याचे चित्र काही केंद्रांवर दिसून आले. आठ केंद्रांवर पार पडलेल्या या मोहिमेचा आढावा उपायुक्त कोकरे यांच्याकडून घेण्यात आला. जमा झालेल्या कपड्यांतून कापडी पिशव्या तयार केल्या जाणार आहेत. महिला बचतगटाच्या माध्यमातून त्या स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचे कोकरे यांनी सांगितले.