शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

रेती माफियांचा 'रात्रीस खेळ चाले'; सारे काही सापडूनही अज्ञातांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 13:50 IST

 डोंबिवली पश्चिमेकडील मोठागाव परिसरात  रात्रीच्या वेळी   अवैध रेतीउपसा करून त्याची वाहतूकही रातोरात  केली  जात आहे.  विशेष म्हणजे  हे ट्रक पोलिसांच्याही नजरेस पडत नसल्यामुळे आश्चर्य  व्यक्त करण्यात येत आहे.  

- मयुरी चव्हाण 

कल्याण : शहरात पुन्हा एकदा कोरोनाच्या संकटाने गंभीर रूप धारण केले असताना   दुसरीकडे मात्र रेतीमाफियांनी अचूक टायमिंग साधत  कल्याण डोंबिवली शहराचे खाडी किनारे पुन्हा एकदा गिळंकृत करायला सुरवात केली आहे. 

 दिवा - मुंब्रा - कळवा   खाडीपरीसर, डोंबिवली पश्चिमेकडील मोठागाव येथील  रेतीबंदर , जुनी डोंबिवली खाडीपरीसर  आदी  भागात  मोठ्या प्रमाणात  अवैध रेती उपसा  सुरु आहे. रेती उपसणे, या रेतीची  पध्दशीरपणे  वाहतूक करणे   हे सर्व प्रकार रात्रीच्या सुमारास सुरू असून सध्या " रात्रीस खेळ चाले" असे म्हणत रेतीमाफियांनी खाडी  किना-यांची अक्षरशः लूट करायला सुरवात केली आहे.                   डोंबिवली पश्चिमेकडील मोठागाव परिसरात  रात्रीच्या वेळी   अवैध रेतीउपसा करून त्याची वाहतूकही रातोरात  केली  जात आहे.  विशेष म्हणजे  हे ट्रक पोलिसांच्याही नजरेस पडत नसल्यामुळे आश्चर्य  व्यक्त करण्यात येत आहे.   मध्य रेल्वेवर  ठाकुर्ली , कोपर , कल्याण, कळवा, मुंब्रा , दिवा , डोंबिवली  या रेल्वे  स्थानकादरम्यान  रेल्वेमार्ग  खाडी किना-याच्या  बाजूला आहे. या ठिकाणी रात्रीच्या वेळी रेती उपसली जाते. त्यामुळे रेल्वे रुळानाही धोका निर्माण झाला आहे.  विशेष म्हणजे   संक्शन  पंपाद्वारे  खाडीतील रेती उपसा करण्यास  कायद्याने बंदी असूनही हि बंदी  झुगारून   रेतीमाफिया प्रशासनाच्या नाकावर टिच्चून   मध्यरात्रीच्या वेळेत  आपला डाव साधून घेत आहेत. 

 रेतीच्या एका  ब्रासची किंमत सध्या  साडेसहा-  सात   हजार ते आठ  नऊ हजार  आहे.  डोंबिवलीत  मोठागाव आणि कोपर खाडीकिनारा  येथे रात्री  30 ते 40 संक्शन  पाईप लावून  शेकडो ब्रास रेतीचा अवैध  उपसा केला जात आहे.  जागेवरच  रेती खरेदी केली तर  त्याची किंमत  कमी असते. मात्र, इतर ठिकाणी  रेती   वाहून नेल्यास  त्याची किंमत वाढते. 

सस्पेंस कायम रेतीमाफियांवर कारवाई करताना रेतीची वाहतूक करणारे  ट्रक ,संक्शन पंप  व इतर यंत्रसामुग्री जप्त  केली जाते.  रेती उपसा करणा-यांवर  बहुतांश वेळेला  फक्त अज्ञात  व्यक्ती म्हणून  गुन्हे दाखल  केले जात असल्याने खरे  रेतीमाफिया कधीच समोर येत नाही. त्यामुळे ते मोकाट सुटतात.