शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा रिक्षा स्टॅण्डची आरटीओलाच माहिती नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 00:48 IST

आयुक्तांचा शुक्रवारी दौरा : अनधिकृत रिक्षा स्टॅण्ड करणार बंद

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण-डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात बेकायदा रिक्षा स्टॅण्डमुळे वाहतूककोंडी होत आहे. हे बेकायदा रिक्षा स्टॅण्ड नेमके किती आहेत, अशी माहिती आयुक्तांनी मंगळवारी झालेल्या वाहतुकीच्या बैठकीत विचारली असता आरटीओला ही माहिती सादर करता आली नाही. ही माहिती घेऊन बेकायदा रिक्षा स्टॅण्ड तातडीने हटविण्यात येतील, असे आयुक्तांनी सांगितले आहे. एका वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने तर शहरात एक तरी अधिकृत रिक्षा स्टॅण्ड आहे की नाही तेच आम्हाला माहीत नाही, अशी धक्कादायक कबुली दिली. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कल्याण-डोंबिवली शहरात अधिकृत आणि बेकायदा रिक्षा स्टॅण्ड किती आहेत. याची विचारणा केली असता त्याची यादी आरटीओला सादर करता आली नाही. रेल्वे स्टेशन परिसरातील रिक्षा स्टॅण्ड आणि पार्किंगच्या व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी आयुक्त आरटीओ आणि वाहतूक पोलिसांसह येत्या शुक्रवारी पाहणी दौरा करणार आहेत.  या बैठकीनंतर सूर्यवंशी म्हणाले की, शहरातील रिक्षा प्रवाशांची मीटरनुसार रिक्षा चालविल्या गेल्या पाहिजेत, अशी मागणी असून त्याचा विचार केला जाईल. शेअर रिक्षामुळेही वाहतूक कोंडीत भर पडते.  शेअर रिक्षा ठिकठिकाणी थांबत जाते. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. यावर विचार केला जाईल. शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी शहरात पाच ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. अन्य तीन ठिकाणची सिग्नल यंत्रणा तयार आहे. ती आता वाहतूक पोलिसांनी ताब्यात घ्यावी, असे वाहतूक पोलिसांना सूचित केले आहे. तसेच अन्य १२ ठिकाणी सिग्नल यंत्रणा उभारण्याचे काम सुरू  आहे. यामुळे वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. 

nशहरात ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयाशी संबंधित असलेले पोलीस हे कल्याणमध्ये येतात. त्यांच्या वाहनांना पार्किंगकरिता वेगळी व्यवस्था करण्यात येणार आहे. जवळपास ८०० पोलिसांच्या वाहनांकरिता पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.nशहरातील अनेक रस्त्यांवर अनावश्यक स्पीडब्रेकर आहेत. त्यांची उंची जास्त आहे. अनावश्यक असलेले स्पीडब्रेकर काढून टाकण्याची कार्यवाही केली जाईल, असेही आयुक्तांनी सांगितले.