शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवली शेअर भाड्यात १५ रुपये कपात, प्रवाशांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 06:54 IST

Kalyan-Dombivali : कल्याण ते डोंबिवली हे अंतर सहा किलोमीटर आहे. या प्रवासाकरिता शेअर भाडे गेल्या मार्च महिन्यात प्रति प्रवासी २५ रुपये होते. लॉकडाऊनमुळे रिक्षा व्यवसाय बंद होता.

कल्याण : कल्याण ते डोंबिवली रिक्षाचे शेअर भाडे १५ रुपयांनी कमी करण्यात आले आहे. कोरोना काळात प्रति प्रवासी ५० रुपये भाडे आकारले जात होते. आता प्रती प्रवासी ३५ रुपये आकारले जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.  कल्याण ते डोंबिवली हे अंतर सहा किलोमीटर आहे. या प्रवासाकरिता शेअर भाडे गेल्या मार्च महिन्यात प्रति प्रवासी २५ रुपये होते. लॉकडाऊनमुळे रिक्षा व्यवसाय बंद होता. जून महिन्यात अनलॉकमध्ये रिक्षा अटींवर सुरू करण्यात आल्या. प्रत्येक रिक्षाचालकाने सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी तीन ऐवजी दोन प्रवासी घ्यायचे, असा नियम केला; मात्र प्रति प्रवासी भाडे किती आकारायचे, याचा कुठेही नियमावलीत उल्लेख नव्हता. प्रति प्रवासी २५ ऐवजी ५० रुपये शेअर भाडे आकारले जाऊ लागले. रेल्वेसेवा बंद असल्याने सामान्यांना भुर्दंड सहन करत प्रवास करणे भाग होते. रेल्वेसेवा सुरू झाली तरी ५० रुपये भाडे आकारले जात होते. हे भाडे कमी करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात होती. रिक्षाचालकांनी भाड्यात १५ रुपयांची कपात करून तशा आशयाचा फलक माहितीसाठी लावला आहे; मात्र आधीचे २५ रुपये शेअर भाडे पाहता सध्या १५ रुपये कपात करूनही प्रवाशाला १० रुपये जास्तीचेच भाडे द्यावे लागत आहे. आता रिक्षातून तीन प्रवासी घेऊन वाहतूक केली जात आहे. प्रति प्रवासी ३५ रुपये भाडे घेतले तरी एका फेरीला तीन प्रवाशांमागे रिक्षाचालकास १०५ रुपये मिळतात. २५ रुपयांचे ५० रुपये भाडे आकारण्यास आरटीओची परवानगी नव्हती. त्यामुळे रिक्षाचालकांचे फावले होते. आरटीओने या भाडेवाढीविरोधात कारवाई करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे आजही प्रवाशांच्या माथी १० रुपयांची भाडेवाढ आहेच. आरटीओच्या म्हणण्यानुसार  कल्याण क्षेत्रातील सर्व रिक्षा सीएनजीवर चालतात; मात्र काही रिक्षाचालकांनी आरटीओला सीएनजी बसविल्याचे सांगून रिक्षा पेट्रोलवर चालवित आहेत. 

रिक्षाची अघोषित भाडेवाढ कमी करण्याची मागणीमहिन्याभरापूर्वी कॅम्प नंबर तीन ते कल्याण दरम्यानच्या प्रवासी भाड्यात पाच रुपयांनी कपात करण्यात आली होती. त्यापाठोपाठ कल्याण ते डोंबिवली दरम्यानच्या भाड्यात १५ रुपयांनी कपात झाली आहे. अघोषित भाडेवाढ कमी करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. त्यासाठी आरटीओने पुढाकार घेतला पाहिजे.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली