शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण वाढल्याने कल्याण-डोंबिवलीत निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 01:02 IST

नियमांचे पालन न केल्यास गुन्हे दाखल करणार : पालिका, पोलीस प्रशासनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी रुग्णसंख्या दुपटीने वाढली. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आरोग्य व पोलीस प्रशासनाची तातडीची बैठक घेऊन, काही निर्बंध तत्काळ प्रभावाने लागू केले. या निर्बंधांचे उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

या बैठकीस आरोग्य खात्याच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, सहायक पोलीस आयुक्त अनिल पोवार आदी उपस्थित होते. या बैठकीपश्चात निर्बंध जाहीर करण्यात आले. महापालिका हद्दीत आजमितीस १२०० रुग्ण उपचाराधीन आहेत. त्यापैकी ३०० रुग्णांचे घरीच विलगीकरण केले आहे. त्यापैकी बहुतांश रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. त्यांच्यावर हेल्थ केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. गंभीर स्वरूपाचे रुग्ण हे तुलनेने कमी आहेत. मास्क न घालता फिरणाऱ्यांवर महापालिकेकडून दंडात्मक कारवाई सुरू आहे. मात्र, तरीही लोक विनामास्क फिरत आहे.  सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत. अशातच रुग्णांची संख्या वाढतेय, ही चिंतेची बाब असल्याने काही कठोर निर्बंध घातल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. लोकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन यावेळी पानसरे यांनी केले. 

गतवर्षी १० मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण महापालिका हद्दीत मिळाला होता. आता वर्षभरानंतर पुन्हा रुग्णसंख्या वाढत असताना, बुधवारी नेमक्या १० मार्च रोजीच प्रमुख १० प्रकारचे निर्बंध लादण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे. 

असे आहेत निर्बंध 

nदुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत सुरू राहतील.nशनिवार आणि रविवारी दुकाने पी-१  आणि पी-२ या समविषम तत्त्वानुसार खुली ठेवता येतील. nखाद्य व शीतपेयाच्या सर्व गाड्या सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील.nभाजी बाजार ५० टक्के क्षमतेनुसार सुरू ठेवता येणार आहे. nलग्न व हळद सभारंभ सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत आखून दिलेल्या मर्यादेनुसार करावे. अन्यथा वधू, वर आणि हॉलमालकाविरोधात गुन्हा दाखल करणार. 

nबार रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहणार. nहोम आयसोलेशन असलेले रुग्ण बाहेर फिरताना आढळल्यास कारवाई केली जाईल. nगुरुवारी महाशिवरात्रीनिमित्त शहरातील ६२ शिवमंदिरे खुली राहतील. पण, दर्शन घेता येणार नाही.nसर्व आठवडीबाजार पूर्णत: बंद राहणार आहेत. nपोळीभाजी केंद्रे रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.  

एकाच दिवसात आढळले कोरोनाचे ३९२ रुग्ण

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. मनपा हद्दीत बुधवारी नवीन ३९२ रुग्णांची भर पडली. मंगळवारी २१८ रुग्ण आढळले होते. त्या तुलनेत बुधवारी नवीन १७४ रुग्णांची भर पडल्याने मनपा प्रशासनाची चिंता वाढली आहे. 

मागील २४ तासांत उपचाराअंती १६९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, नव्याने आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. त्यामुळे अंशत: लॉकडाऊन होण्याचे संकेत मिळत आहेत. बुधवारच्या रुग्णांमुळे मनपा हद्दीतील एकूण रुग्णसंख्या ६५ हजार ४६५ रुग्ण आढळले आहेत, तर यातील ६१ हजार ८९६ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. मागील २४ तासांत एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. सध्या दोन हजार ३६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सर्वाधिक रुग्ण डोंबिवली पूर्व आणि कल्याण पश्चिममध्ये आढळून येत आहेत. बुधवारीही डोंबिवली पूर्वेत १२९ तर कल्याण पश्चिमेत १२८ रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे चाचणीअंती आढळून आले आहे.

१७४ रुग्णांची भर : चिंता वाढली 

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका