शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमधील रवींद्र ओक शाळेने गरीब विद्यार्थ्यांना मोबाईलचे केले वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 18:36 IST

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शाळेच्या मुख्याध्यापिका मेधा कुलकर्णी यांनी चांगलं कार्य करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण प्रयत्न केले तर मदतीचे हात पुढे येतात असे विचार मांडले.

कल्याण- कोरोनाचा काळ सुरू झाल्यापासून फी भरण्यावरून  हायफाय इंग्रजी शाळांचे अनेक वाद  समोर आलेत. इतकंच नाही तर फी अभावी अनेक विद्यार्थ्यांना घरचा रस्ता दाखविण्यापर्यंत शाळांची मजल गेली. मात्र कठीण काळात मराठी शाळाचं  गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी धावून आल्याचं कल्याणमध्ये पाहायला मिळाले आहे. कल्याणमध्ये बालक मंदिर संस्थेच्या रवींद्र ओक शाळेने मुलांचे ऑनलाईन  शिक्षण  सुरू राहावे म्हणून 35 गरजू - गरीब विद्यार्थ्यांना मोबाईलचे वाटप केले आहे. काही दिवसांपूर्वीच बालक मंदिर संस्थेने  असा अनोखा उपक्रम हाती घेत सुमारे 40 गरजू विद्यार्थ्यांना  मोबाईचे वाटप केले होते. आता पुन्हा एकदा बालक मंदिर संस्था विद्यार्थ्यांसाठी देवासारखी धावून आली आहे.         कोरोनाच्या  परिस्थितीमुळे शाळा बंद असताना विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागत आहे. शाळेतील अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ते आपल्या पाल्यांना स्मार्टफोन देऊ शकत नाही . परिणामी विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहावे लागते. ही गोष्ट लक्षात घेत शाळेने आपल्या माजी विद्यार्थ्यांना मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत शाळेचे माजी विद्यार्थी  मकरंद मुळे यांनी 15 स्मार्टफोन व 1995 च्या एसएससी बॅचने 15 स्मार्टफोन  अशा प्रकारे  शिक्षक, माजी विद्यार्थी यांच्याकडून आलेल्या  जवळपास 35 मोबाईल फोन गरजू विद्यार्थ्यांना  देण्यात आले. संस्थेच्या टिळक चौक येथील सभागृहात  हा अनोखा सोहळा संपन्न झाला. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शाळेच्या मुख्याध्यापिका मेधा कुलकर्णी यांनी चांगलं कार्य करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण प्रयत्न केले तर मदतीचे हात पुढे येतात असे विचार मांडले. 95 च्या एसएससी बॅच तर्फे बोलताना अमोद गोरे यांनी शाळेत कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी आमची बॅच सदैव तयार असल्याचं आश्वासन दिलं. शिक्षकांतर्फे  उत्तम गायकवाड यांनी कोरोनाच्या परिस्थितीचा विद्यार्थ्यावर झालेला परिणाम व विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शाळेने व शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

महिला पालकांनी आपले मत व्यक्त करताना त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीची माहिती सांगितली. यावेळी कोरोनामुळे झालेले नुकसान सांगत असताना त्या भावनिक झाल्या. या परिस्थितीत त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाकरिता करीत असलेल्या प्रयत्नांसाठी त्यांनी शाळेचे व संस्थेचे आभार मानले. शालेय समितीचे अध्यक्ष विजय नाफडे यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईलचा उपयोग अभ्यासासाठी कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमुख्याध्यापिका नीता माळी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयश्री देवस्थळी, कैलास सरोदे, पांडुरंग भारती ,देवेंद्र कापसे, शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी  विशेष मेहनत घेतली.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका