शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पीएफचे ११० कोटी रुपये वसूल करण्यास स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 07:41 IST

Kalyan : २०११ ते २०१६च्या कालावधीत महापालिकेतील कंत्राटदारांनी त्यांच्या कंत्राटी कामगारांच्या पीएफचे पैसे पीएफ कार्यालयाकडे भरलेले नाहीत.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने कंत्राटी कामगारांच्या पीएफचे पैसे पीएफ कार्यालयात भरले नसल्याने ११० कोटी रुपये थकल्याची नोटीस पीएफ कार्यालयाने मनपास बजावली होती. याप्रकरणी महापालिका  प्रशासन पीएफ लवादाकडे अपिलात गेले होते. लवादाने कोरोना असल्याने ही रक्कम वसुलीसाठी सक्ती करता येत नाही, असे स्पष्ट करीत वसुलीस ८ जानेवारीपर्यंत स्थगिती दिली आहे.लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे यांनी यासंदर्भात माहिती दिली. २०११ ते २०१६च्या कालावधीत महापालिकेतील कंत्राटदारांनी त्यांच्या कंत्राटी कामगारांच्या पीएफचे पैसे पीएफ कार्यालयाकडे भरलेले नाहीत. महापालिकेला पीएफचा अकाउंट नंबर २०१४ मध्ये मिळाला. त्यानंतर मनपाने त्याचा पाठपुरावा करून ही रक्कम भरणे अपेक्षित होते. महापालिका निविदा कढून विकासकामांचे कंत्राट कंपन्यांना देते. या कंपन्यांनी त्यांच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पीएफची रक्कम पीएफ कार्यालयात भरली पाहिजे. मात्र, कंत्राटदारांनी २०११ ते २०१६ या दरम्यान पीएफची रक्कमच भरलेली नाही. मनपाने या कालावधीत किती विकासकामांच्या निविदा मागविल्या याची माहिती पीएफ कार्यालयाने मागितली होती. मात्र, ही माहिती महापालिकेने तातडीने दिली नाही. त्यामुळे पीएफ कार्यालयाने मनपाच्या बॅलन्स शीटच्या आधारे ११० कोटी रुपये पीएफचे थकल्याचे मनपास सांगितले आहे.विकासकामे महापालिकेने केली आहेत. परंतु, कंत्राटदार ही रक्कम भरण्यास तयार नसल्यास महापालिकेला ही रक्कम भरावी लागणार आहे. त्यामुळे ही नोटीस मिळताच महापालिकेने कंत्राटदारांची झाडाझडती सुरू केली आहे. शहर अभियंता कार्यालयातून कंत्राटदारांना पीएफ न भरल्याप्रकरणी नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

मनपा ‘त्या’ कंत्राटदारांना बजावणार नोटीस- सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात निकाल देताना कोरोना काळात कोणत्याही थकीत वसुलीसाठी सक्ती करता येत नाही, असे स्पष्ट केले होते. केडीएमसीला ११० कोटींच्या थकबाकीची नोटीस मिळाल्याने प्रशासनाने पीएफ लवादाकडे अपील करून याप्रकरणी दाद मागितली होती.- लवादाने याप्रकरणी बुधवारी निकाल देताना कोरोना काळात सक्तीने रक्कम वसूल करता येत नाही, असे सांगितले. आता या अपिलावर पुढील सुनावणी ८ जानेवारीला होणार आहे. त्यामुळे केडीएमसीला तोपर्यंत दिलासा मिळाला आहे.- दरम्यान, ज्या कंत्राटदारांनी कर्मचाऱ्यांचा पीएफ भरलेला नाही, अशा कंत्राटदारांना मनपा येत्या सोमवारपासून नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे.

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका