शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

होम क्वारंटाइन रहिवाशांवर पोलीस ठेवणार नजर; केडीएमसीची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 00:17 IST

पावणेदोन लाख रहिवाशांची यादी देणार 

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना होम क्वारंटाइन केलेले बरेच जण मोकाट फिरताना दिसत आहेत.  यामुळे त्यांना वेसण घालून कोरोनास रोखण्यासाठी होम क्वारंटाइन असलेल्यांची यादी पोलीस ठाण्यात देण्याबरोबरच त्यांच्या घरावर होम क्वारंटाइनचे स्टिकर्सही लावले जाणार आहे. यामुळे होम क्वारंटाइन असलेली व्यक्ती मोकाट फिरताना दिसल्यास त्याविरोधात पोलिसांना कारवाई करणे सोपे जाईल, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली.  होम क्वारंटाइन केलेले अनेक जण मोकाट फिरताना दिसतात, असे सांगून त्यांच्याविरोधात पोलिसांकरवी कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी म्हटले होते. मात्र, आता त्याचे पुढचे पाऊल म्हणजे होम  क्वारंटाइन असलेल्यांची यादीच पोलिसांच्या हाती दिली जाणार आहे. सध्या महापालिकेने १४ दिवसांकरिता एक लाख ८३ हजार ८८५ जणांना होम क्वारंटाइन केले आहे. मार्च २०२० पासून आतापर्यंत एकूण १५ लाख १० हजार २२३ जणांना होम क्वारंटाइन केले असून यापैकी १३ लाख ३२६ जण क्वारंटाइनमुक्त झालेले आहेत. महापालिका हद्दीत आता कोरोना डबलिंगचा रेट ६० दिवसांचा आहे. रुग्णांच्या मृत्यूचा दर १.५७ टक्के आहे.  गेल्या १५ दिवसांत कोरोनामुळे ३१ जणांचा मृत्यू झालेला आहे.  तर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.३८ टक्के इतके आहे. रोज ७०० जणांची चाचणीकल्याण रेल्वेस्थानकात बाहेरगावाहून येणा-या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात आहे. २४ तास त्याठिकाणी चाचणी पथक तैनात आहे. रोज किमान ७०० प्रवाशांची चाचणी केली जात आहे. त्याठिकाणी लॅब टेक्निशियन असतो.  मात्र, कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाला रुग्णवाहिका नेण्यास आली नाही, म्हणून एका रुग्णाने पलायन केले होते. हा प्रकार टाळण्यासाठी महापालिकेने त्याठिकाणी रुग्णवाहिका तैनात केली आहे. याठिकाणी पोलीस बंदोबस्त नसतो. पॉझिटिव्ह आलेले काही रुग्ण हे भिवंडीचे होते, असे डॉ. पानपाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या