शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

बहुमजली ठाणे सिव्हिल हॉस्पिटलचा मार्ग सुकर; सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची माहिती 

By अनिकेत घमंडी | Updated: August 22, 2022 18:51 IST

रुग्णालयाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून ठाणे कल्याण डोंबिवली भिवंडी बदलापूर अंबरनाथ मुरबाड व अन्य शहरी आणि ठाणे ग्रामीण भागातील रुग्णांना या प्रस्तावित बहू मजली बहू उद्देशीय रुग्णालयाचा फायदा होणार आहे. 

अनिकेत घमंडी

डोंबिवली - ठाणे जिल्ह्यासाठी अतिशय महत्वाच्या अशा ९०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाच्या प्रस्तावित बहुमजली इमारती संदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी रुग्णालयाच्या निविदापूर्व प्रक्रियेतील  प्रशासकीय अडथळ्यांचा निपटारा करण्याचे आदेश सोमवारी प्रशासनाला दिले.  त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या प्रस्तावित ठाणे जिल्हा रुग्णालय, परिचारिका प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह या बहू उद्देशीय बांधकामामागचं विघ्न दूर होणार आहे. ५२७.४१ कोटी रुपयांच्या खर्चाच्या या प्रकल्पाला अगोदरच मंजुरी मिळाल्यानंतरही रेंगाळलेल्या या प्रकल्पाला आता खऱ्या अर्थाने चालना मिळाली आहे. रुग्णालयाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून ठाणे कल्याण डोंबिवली भिवंडी बदलापूर अंबरनाथ मुरबाड व अन्य शहरी आणि ठाणे ग्रामीण भागातील रुग्णांना या प्रस्तावित बहू मजली बहू उद्देशीय रुग्णालयाचा फायदा होणार आहे. 

ठाणे जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, ठाणे महानगरपालिका, भूमी अभिलेख कार्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यकक्षेत मोडणारे विविध विषय गेली अनेक दिवस प्रलंबित आहेत. यामध्ये प्रामुख्याने जमिनीच्या मालमत्ता पत्रकावर सरंक्षण विभागाऐवजी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभाग जिल्हा शल्य चिकित्सक ठाणे यांची नोंद होणे, रुग्णालय बांधकामास पालिकेने तात्काळ मंजुरी देणे, पर्यावरण खात्याची मंजुरी आणणे, अग्निशमन दलाची परवानगी आणणे, इमारतीस अडथळा होणारी झाडे तोडणे अशा विविध प्रशासकीय मान्यता मिळवण्यास चालना देण्यात आली. 

ठाणे जिल्ह्यातील एकमेव मंत्री या नात्याने कामाला सुरुवात केली तेव्हा जिल्ह्यातील आरोग्य सुविधांसाठी गरजेच्या  नियोजित ठाणे जिल्हा रुग्णालयाला प्रशासकीय अडथळ्यांची बाधा झाल्याचे  चव्हाण यांना समजले. याबाबत माहिती मिळताच चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे महानगरपालिका व सा. बां. खात्याची जबाबदारी  निश्चित करून याबाबत अधिक वेगाने कामे करण्याचे आदेश चव्हाण यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या उच्चस्तरीय अधिकारी वर्गाच्या बैठकीत चव्हाण यांनी पुढील दीड वर्षात जिल्हा रुग्णालय ठाणे जिल्हावासियांच्या सेवेत येईल अशी अपेक्षा व्यक्त केली. या प्रसंगी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, सा. बां. सचिव साळुंखे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, भूमी अभिलेख उप अधीक्षक योगेश सावकार, ठामपाचे सतीश उईके, अशोक राजमाने, सा. बां. ठाणे विभाग कार्यकारी अभियंता सुनील पाटील असे जिल्ह्यातील सर्व उच्च पदस्थ अधिकारी हजर होते.