शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल गेला, पण जीव वाचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 00:25 IST

घटना सीसीटीव्हीत कैद 

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : चालत्या लोकलमध्ये मोबाइल हिसकावणाऱ्या चोरट्याला पकडण्याच्या नादात प्रवासी लोकलखाली येण्यापासून थोडक्यात बचावल्याची घटना शुक्रवारी सकाळी आंबिवली स्थानकात घडली. दरम्यान, मोबाइल चोरून पलायन केलेल्या चोरट्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने अवघ्या २४ तासांत अटक केली.

नाशिकमध्ये राहणारे विनायक उन्हाळे मुंबई एअरपोर्ट येथे कामाला आहेत. ते रोज नाशिक ते मुंबई असा प्रवास करतात. गुरुवारी त्यांची रात्रपाळी होती. सकाळी त्यांनी नाशिक येथे जाण्यासाठी घाटकोपर येथून कसारा लोकल पकडली. सकाळी १० वाजून ५० मिनिटांच्या आसपास गाडी आंबिवली रेल्वे स्थानकात उभी असताना, एक तरुण गाडीत चढला आणि विनायक यांच्या हातातील महागडा मोबाइल हिसकावून त्याने पळ काढला. विनायक यांनी चोरट्याचा पाठलाग केला. इतक्यात गाडी सुरू झाली. ती गाडी पकडण्याच्या नादात विनायक गाडी आणि फलाट यामध्ये पडणार होते, ते थोडक्यात बचावले, अन्यथा चालत्या गाडीखाली सापडले असते. 

२४ तासांत चोरट्यास अटक सीसीटीव्हीच्या मदतीने कल्याण लोहमार्ग पोलिसांनी त्या चोरट्याचा शोध सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मिक शादरुल आणि त्यांच्या पथकाने शोध घेतला. २४ तासांच्या आत चोरट्यास अटक करण्यात पथकाला यश आले. मारुती सकट असे चोरट्याचे नाव असून, त्याच्याकडून चोरीचा मोबाइल जप्त करण्यात आला आहे. त्याने अन्य किती गुन्हे केले आहेत, याचा तपास पोलीस करीत आहेत.