शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसी आरोग्य खात्याच्या गलथान कारभारा विरोधात मनसेचे आंदोलन

By मुरलीधर भवार | Updated: September 11, 2023 18:35 IST

आरोग्य खात्याचे प्रवेशद्वारच केले बंद

कल्याणरुक्मीणीबाई रुग्णालयाच्या दारात एका महिलेची प्रसूती झाल्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते महापालिकेच्या आरोग्य खात्यास जाब विचारण्यासाठी पोहचले. त्याठिकाणी कार्यकर्त्यांना प्रवेशद्वाराजवळ सुरक्षा रक्षकांनी रोखल्याने कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वार आेढणीने घट्ट बांधून बंद केले. जोपर्यंत या प्रकरणात जबाबदार अधिकारी समोर येत नाही. तोपर्यंत एकालाही कार्यालयाच्या बाहेर जाऊ देणार नाही असा इशारा देत महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्या नेतृत्वात महापालिका मुख्यालयात करण्यात आलेल्या आंदोलनात ममनसे पदाधिकारी कपील पवार, महेंद्र कुंदे, उदय वाघमारे, महिला पदाधिकारी उर्मिला तांबे आणि शितल विखणकर, चेतना रामचंद्रन, मनिषा डोईफोडे आदी कार्यकर्ते सहभागी होते. यावेळी मनसे आंदोलकांनी मुख्य वैद्यकीय अधिकारी डा’. अश्वीनी पाटील आणि वैद्यकीय अधिकारी प्रतिभा पानपाटील यांनी भेटण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सुरक्षा रक्षकांनी कार्यालयाचे प्रवेश द्वार तातडीने लावून घेत कार्यकर्त्यांना प्रवेशद्वावरच रोखून धरले. तेव्हा महिला कार्यकर्त्यांनी प्रवेश द्वार आेढणीने बांधून ठेवले.

महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्याचबरोबर अधिकारी यांचा सत्कार करण्यासाठी आणलेली ट्रा’फी, पुष्पगुच्छ आणि पत्र हे प्रवेशद्वाराला बांधून जाहिर निषेध व्यक्त केला. या आंदोलनाची भनक पोलिस आणि सुरक्षा रक्षकांना मनसेने लागू दिली नाही. मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी महिला प्रसूती प्रकरणात प्रशासनाकडून खोटारडपणा केला जात आहे. त्यानंतर आयुक्त चौकशी करण्यात येईल असे सांगतात. महापालिकेच्या आराेग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. प्रशासनाचा खाेटे बोलण्यात पहिला नंबर आला आहे. त्यामुळे त्यांना ट्रा’फी, पुष्पगुच्छ आणि पत्र दिले आहे. आराेग्य सेवा योग्य प्रकारे दिल्या नाही तर प्रशासनाची मनसेसोबत गाठ आहे असा सज्जड इशारा प्रशासनाला दिला आहे.

टॅग्स :kalyanकल्याण