शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

बॅरिकेड्स सरकवून दुचाकीस्वारांचा जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 00:13 IST

डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर उड्डाणपूल सध्या बंद आहे. त्यामुळे वाहतूक ठाकुर्ली पुलावरून सुरू आहे. कल्याण रोडवरील मंजुनाथ शाळा, व्ही.पी. रोडवरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी काही रस्ते एक दिशा मार्ग केले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क डाेंबिवली : अनलॉकमध्ये आता सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाल्याने शहरात पुन्हा वाहतूककोंडी होऊ लागली आहे. मात्र, कल्याण रोडवर पारसमणी चौक ते मंजुनाथ शाळेदरम्यान ही कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी लावलेले प्लास्टिकचे दुभाजक आणि बॅरिकेड्स बाजूला सरकवून दुचाकीस्वार बिनधास्त ये-जा करत आहेत. त्यामुळे हा शॉर्टकट अपघाताला निमंत्रण देणाराच ठरत आहे. या प्रकारामुळे वाहतूककोंडीत भरच पडत असल्याने नियमबाह्य क्रॉसिंग तातडीने थांबवावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.

डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर उड्डाणपूल सध्या बंद आहे. त्यामुळे वाहतूक ठाकुर्ली पुलावरून सुरू आहे. कल्याण रोडवरील मंजुनाथ शाळा, व्ही.पी. रोडवरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी काही रस्ते एक दिशा मार्ग केले आहेत.मंजुनाथ शाळेच्या चौकात तसेच जुन्या रामचंद्र टॉकीजकडे जाणाऱ्या रस्त्यांवर दुभाजक, बॅरिकेड्स लावले आहेत. त्यामुळे एमआयडीसीकडून आलेली वाहने मंजुनाथ शाळेच्या चौकात उजवीकडे वळून व्ही.पी. रोडने पश्चिमेस जाऊ शकत नाहीत. व्ही.पी. रोडने व जुन्या रामचंद्र टॉकीजवरून आलेल्या वाहनांना उजवीकडे वळून पारसमणी चौकाकडे थेट जाता येत नाही. तसेच रामचंद्र टॉकीजवरून आलेल्या वाहनांना सरळ गोपाळनगर गल्ली क्रमांक १ मध्ये ये-जा करता येत नाही. मात्र, दुचाकीस्वार हे बॅरिकेड्स, दुभाजक सरकवून ये-जा करत आहेत. त्यामुळे कल्याणकडे जाणाऱ्या तसेच तेथून पारसमणी चौकाकडे येणाऱ्या दोन्ही लेनमध्ये वाहतूककोंडी होत आहे.

दुचाकीस्वार ट्रिपल सीट घेऊन वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवताना दिसतात. अशा पद्धतीने दुचाकीने नेताना एखाद्याचा तोल गेल्यास अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी अशा वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.