शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कचरा उचलला न गेल्यानं कल्याणच्या मच्छीमार्केमध्ये आळ्यांचे साम्राज्य; ग्राहकांसह दुकानदारचंही आरोग्य धोक्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 14:16 IST

कल्याणच डम्पिंग ग्राऊंड बंद झाल्यानं सर्व स्तरातून पालिका प्रशासनाच  तोंडभरून कौतुक करण्यात आलं.

कल्याण:  मोठा गाजावाजा करत कल्याण पश्चिम येथील आधारवाडी  डम्पिंग ग्राऊंड बंद झाल्याच प्रशासनानं जाहीर केलं. मात्र  कल्याण डोंबिवली शहरात अनेक ठिकाणी कच-याचे ढीग असल्याच दिसून येतंय. कचरा वेळेत उचलला न गेल्यानं  मच्छीमार्केटला देखील अवस्था बिकट झालीये. कल्याणच्या छाया टॉकीजजवळील मच्छी मार्केमधला कचरा गेल्या 8 दिवसांपासून उचलला न गेल्याने त्याठिकाणी अक्षरशः आळ्यांचे साम्राज्य पसरलेय. परिणामी याठिकाणी व्यवसाय करणारे मच्छीविक्रेते आणि याठिकाणी खरेदीसाठी येणारे ग्राहक दोघांचेही आरोग्य धोक्यात आलेय. कच-यामुळे  ग्राहकांनी  मार्केटकडे पाठ फिरवली  असून आमच्यावर उपासमारीची वेळ आलीये अस  येथील  विक्रेत्यांनी सांगितलं.

कल्याणातील महत्वाच्या मार्केटपैकी एक असणाऱ्या या मार्केमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात मच्छी, मटण, चिकन विक्री होत असते. साहजिकच त्यामुळे दररोज त्याच्याशी संबंधित टाकाऊ कचराही मोठ्या प्रमाणात पडत असतो. मात्र गेल्या 8 दिवसांपासून हा सर्व कचरा उचललाच न गेल्याने याठिकाणी अक्षरशः प्रचंड प्रमाणात दुर्गंधी तर पसरली आहेच. पण आता त्याजोडीला हा सर्व कचरा सडू लागल्यानं पांढऱ्या रंगाच्या मोठ्या आळ्याही झाल्यात.

कल्याण पश्चिमेला असणारे हे मच्छी मार्केट बरेच जूने असून याठिकाणी 100 हून अधिक मच्छी विक्रेते आणि महिला व्यवसाय करत आहेत. मच्छीबरोबरच याठिकाणी चिकन आणि मटण विक्रीही केली जातेय. यासंदर्भात महापालिका प्रशासन आणि संबंधित विभागाला वारंवार हा कचरा उचलण्यासाठी कळवले. मात्र त्यांच्याकडून उडवा उडवीची उत्तरे देण्यात आल्याची माहिती स्थानिक विक्रेत्यांनी दिली. याबाबत  घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांना संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. 

कल्याणच डम्पिंग ग्राऊंड बंद झाल्यानं सर्व स्तरातून पालिका प्रशासनाच  तोंडभरून कौतुक करण्यात आलं. मात्र यामुळे हुरळून गेलेल्या पालिका प्रशासनाने शहरातील  इतर कच-याच्या समस्यांकडे देखील गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.  अन्यथा कचऱ्याविरोधातील हे युद्ध जिंकूनही छोट्या छोट्या लढायांमध्ये मात्र पदरी निराशा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता केडीएमसी आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी हे सफाई कर्मचारी व इतर कर्मचा-यांना याबाबत खडे बोल सुनावतात का? ते पाहाव लागेल. 

टॅग्स :Fishermanमच्छीमारkalyanकल्याण