शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कर्करोगासाठी 'या' गोष्टी ठरतायत कारण; पाहा काय म्हणाले तज्ज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 19:43 IST

देशात 17 ते 18 लाख कर्करोग रुग्ण आहेत.

कर्करोग हा गंभीर विषय असून याकडे सरकारने अधिकाधिक लक्ष देणे गरजेचे आहे. देशात 17 ते 18 लाख कर्करोग रुग्ण आहेत. हवेतील प्रदूषण, आर्टिफिशल फूड, चीज यामुळे फॅट वाढते, व्यायामाकडे दुर्लक्ष परिणामी वजन वाढते या बाबी कर्करोग होण्यासाठी आमंत्रण देणाऱ्या आहेत," अशी माहिती कर्करोग तज्ञ डॉ.अनिल हेरूर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कर्करोग हा आरोग्याचा विषय नाही तर तो सामाजिक विषय आहे. मुंबईत कर्करोगावर उपचार करणारे रुग्णालय असल्याने राज्यातील अनेक ग्रामीण भागातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यामुळे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कर्करोग उपचार केंद्र असणे ही काळाची गरज आहे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

कोरोना काळात कर्करोग रूग्णांची झालेली वैद्यकीय होरपळ, आर्थिक कुचंबणा आणि यामुळे कर्करोग रुग्णांची सध्याची परिस्थिती याविषयावर डॉ.हेरूर यांनी संवाद साधला. "आपल्या देशात 40 ते 60 वयोगटातील लोकांमध्ये मोठया प्रमाणात कर्करोग दिसून येतो. हाच गट कुटुंबासाठी महत्वाचा असतो. जेव्हा 40 ते 60 वयोगटातील कर्करोग रुग्ण आजारी पडतो तेव्हा पूर्ण कुटुंबाची वाताहात होते. देशात 17 ते 18 लाख कर्करोग रुग्ण आहेत. कोरोना काळात कर्करोग रुग्ण अनेक कारणांमुळे हॉस्पिटलमध्ये पोहचू शकले नाहीत. त्या दरम्यान प्रवासाला प्रतिबंध आणि आर्थिक अडचण होती. परिणामी औषोधोपचार मिळाले नाहीत," असं त्यांनी नमूद केलं. 

कोरोना काळात कर्करोग बरा झाल्यानंतर तो पुन्हा होण्याचं प्रमाण दिसून आलं. मात्र याची गणना राष्ट्रीय स्तरावर झाली नाही. पण दहा वर्षानंतर पूर्णपणे बरा झालेला कर्करोग रुग्ण पुन्हा कर्करोगाने त्रस्त झाल्याचे दिसून आले. ही बाब कदाचित कोरोनामुळे जी प्रतिकारशक्ती कमी झाली त्याचा परिणाम असू शकतो. कोरोना हा विषय सोडला तर गेल्या पाच वर्षात कर्करोग रुग्णांची संख्या 10 ते 15 टक्क्यांनी वाढली आहे. ज्यांना कर्करोग होता आणि त्यांचे उपचार सुरू होते, त्यांना कोरोना झाला तर त्या परिस्थितीत मृत्यूचे प्रमाण 25 टक्के होते. आता ते प्रमाण कमी होत आहे. कर्करोग आणि आहार यांचा जवळचा संबंध असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

आहार महत्त्वाचाआपण काय खातो, काय करतो यावर खूप अवलंबून आहे. आहारात दूध, तेल याचं प्रमाण जास्त असेल तर कर्करोग होण्यासाठी ते कारण ठरतं. स्मोकिंग विचारत घेतले तर 80 टक्के लोकांना कर्करोग होण्याची दाट शक्यता असते. तंबाकू, गुटका, तपकीर यामुळे होणाऱ्या कर्करोगाची संख्या जास्त आहे. महिलांमध्ये ब्रेस्ट कर्करोग प्रमाण जास्त असून ते वाढतच आहे याचं कारण  स्मोकिंग आहे. स्त्री शरीरावर स्मोकिंगचे परिणाम अधिक होते. कर्करोग हा नशिबाने होत नाही तर तो तुमच्या लाइफस्टाइलमुळे होत असतो. काही प्रमाणात वतावरणामुळे होण्याची दाट शक्यता असते. कर्करोग हा आरोग्याचा विषय नाही तर तो समाज व्यवस्थेचा विषय असल्याचेही डॉ.हेरूर यांनी सांगितले.

टॅग्स :cancerकर्करोग