शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसी निवडणूक : युती, आघाडीच्या चर्चांनी संभ्रम; कोणता प्रभाग येणार कोणाच्या वाट्याला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 07:46 IST

KDMC elections: केडीएमसी निवडणुका २०१५च्या प्रभागरचनेनुसार होणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षण सोडत प्रक्रिया जानेवारीत होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

कल्याण : आगामी सर्व निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार असे स्पष्टीकरण आघाडीच्या नेत्यांकडून दिले जात असताना, दुसरीकडे केडीएमसीच्या निवडणुकीत मनसे-भाजप युतीच्या चर्चांनाही उधाण आले आहे. आघाडी आणि युतीच्या चर्चांनी निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले कार्यकर्ते संभ्रमात आहेत. आघाडी आणि युती झाली, तर आपल्या पक्षाच्या वाट्याला कोणता प्रभाग येईल, ही चिंता त्यांना सतावत आहे.केडीएमसी निवडणुका २०१५च्या प्रभागरचनेनुसार होणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षण सोडत प्रक्रिया जानेवारीत होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. प्रभागाची रचना कायम राहिल्याने इच्छुकांना दिलासा मिळाला आहे. प्रभागात कोणते आरक्षण पडतेय, याची चिंता संबंधितांना लागली आहे. त्यात आता निवडणूक आघाडी आणि युतीतून लढण्याच्या चर्चांनी इच्छुकांच्या चिंतेत भर पडली आहे. सर्वच पक्षांतील हवशे, गवशे आणि नवशे समाजकार्याला लागल्याचे सोशल मीडियावर आजकाल मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पोस्टमधून दिसत आहेत. 

बुडत्याला काडीचा आधार२०१५च्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले. काँग्रेसचे जेमतेम चार तर राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक निवडून आले. २०१०ची केडीएमसीची पहिली निवडणूक लढवणाऱ्या मनसेचे त्यावेळी २८ नगरसेवक निवडून आले हाेते, पण २०१५ मध्ये ही संख्या ९पर्यंत घसरली. येत्या निवडणुकीच्या निमित्ताने मनसे आणि भाजप युतीविषयी अद्याप चर्चाच आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची स्थानिक पातळीवरील दयनीय स्थिती पाहता, महाविकास आघाडीतून निवडणूक लढवताना शिवसेना ही काँग्रेस, राष्ट्रवादीसाठी ‘बुडत्याला काडीचा आधार’ ठरू शकते, असे जाणकारांचे मत आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका