शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसी निवडणुकीची अनिश्चितता कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 00:55 IST

प्रभागरचनेच्या चिंतेत इच्छुक दिशाहीन

प्रशांत मानेलोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे केडीएमसीची निवडणूक होणार कधी? याबाबतची अनिश्चितता कायम आहे. आरक्षणप्रक्रियाही पार पडलेली नाही. त्यात निवडणूक ११८ प्रभागांमध्ये होणार की १२२ याचाही निर्णय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले हवशे गवशे आणि नवशे दिशाहीन झाल्याचे चित्र आहे.केडीएमसीची निवडणूक गेल्यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणे अपेक्षित होते. परंतु, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणूक होऊ शकलेली नाही. नोव्हेंबरपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने लवकरच निवडणुकीची तारीख जाहीर होईल, अशी आशा होती.  दुसरीकडे राज्य सरकारने मनपा हद्दीतील १८ गावे वगळल्याने निवडणूक आयोगाने नवीन प्रभागरचनेच्या कामाला सुरुवात करून ते पूर्णही केले होते. परंतु, १८ गावे वगळण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने डिसेंबरमध्ये रद्दबातल ठरवल्याने निवडणूक २०१५ च्या प्रभाग रचनेनुसार होतील, हे स्पष्ट झाले. यात जानेवारीत आरक्षणप्रक्रिया पार पडणार होती. प्रभागाची रचना कायम राहिल्याने इच्छुकांना दिलासा मिळाला होता. परंतु, उच्च न्यायालयाच्या निर्णयाला मनपाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर एकूणच या प्रक्रियेला खीळ बसली आहे. निवडणूक जर पूर्वीच्या १२२ प्रभागांमध्ये झाली तर तेथे कोणते आरक्षण पडेल आणि जर निवडणूक ११८ प्रभागांत झाली तर प्रभागाच्या रचनेत  नव्याने कोणते बदल झाले असतील, कोणते आरक्षण पडेल, त्यात आपल्यासाठी प्रभाग सोयीचा ठरेल का, या चिंतेने निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांनी दोन नव्हे, तर चार दगडांवर पाय ठेवल्याची चर्चा सध्या जोमाने सुरू आहे. १२ मार्चच्या सुनावणीकडे लक्ष मनपाने दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर १२ मार्चला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून त्यावेळी केवळ सुनावणी होते की निर्णय दिला जातो, याकडे प्रशासनासह इच्छुकांचे लक्ष लागले आहे. मे अथवा जूनमध्ये निवडणूक होईल, असा अंदाज व्यक्त होत असताना पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढल्याने निवडणूक अजून लांबणीवर पडण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे इच्छुकांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.