शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणचा स्कायवॉक झालाय चोर, गर्दुल्ल्यांचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 00:09 IST

नागरिकांची सुरक्षा धोक्यात : प्रवाशांना लुटण्याचे प्रकार वाढले, ठोस कारवाईची गरज

n  लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : गर्दुल्ले आणि लुटारू यांच्यामुळे स्कायवॉकवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. गर्दुल्ल्यांकडून तरुणीची छेड काढल्याची घटना ताजी असतानाच, मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एका तरुणाला मारहाण करीत त्याच्याकडील मोबाइल खेचून लुटारूंनी पलायन केल्याची घटना घडली आहे. या दोन्ही घटनांनी येथील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, या गंभीर घटनांनंतर तरी प्रशासन जागे होईल का, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि वाहतूककोंडीतून सुटका करण्याच्या अनुषंगाने २०१०/११ मध्ये पश्चिमेकडील भागात स्कायवॉकची उभारणी केली गेली. एमएमआरडीएच्या माध्यमातून बांधलेल्या स्कायवॉकची जबाबदारी सद्यस्थितीला केडीएमसीकडे आहे. स्कायवॉक रेल्वेच्या पुलाला जोडून असल्याने मोठ्या संख्येने प्रवासी त्याचा वापर करतात. या स्कायवॉकमुळे फेरीवाल्यांचा त्रास वाचेल, तसेच वाहतूककोंडीतून मुक्तता होईल, अशी अपेक्षा होती, परंतु फेरीवाल्यांनीच स्कायवॉकवर ठाण मांडल्याने ही अपेक्षा फोल ठरली आहे. फेरीवाल्यांच्या कचऱ्यामुळे या ठिकाणी आगी लागण्याच्या घटनाही वारंवार घडल्या आहेत. फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाबरोबरच भिकारी, गर्दुल्ल्यांचा उपद्रव कायम राहिल्याने पहाटे अथवा रात्री उशिरा या स्कायवॉकवरून प्रवासी अथवा नागरिकाला जीव मुठीत धरूनच मार्गस्थ व्हावे लागते. फेरीवाले, भिकारी आणि गर्दुल्ले यांचा वावर मोठ्या प्रमाणावर असल्याने एक प्रकारे बकाल स्वरूप या स्कायवॉकला आले आहे. त्यात मंगळवारी स्कायवॉकवरून जाणाऱ्या तरुणीचा गर्दुल्ल्याने पाठलाग करत छेड काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी संतप्त झालेल्या तरुणीसह तिच्या मैत्रिणींनी आणि नागरिकांनी त्याला बेदम चोप दिल्याची घटना घडली. छेडछाडीचा हा प्रकार घडून २४ तासही उलटत नाहीत, तोच स्कायवॉकवरून जाणाऱ्या तरुणाचा मोबाइल चोरून त्याला मारहाण केल्याचा प्रकार रात्री दहाच्या सुमारास घडला. नीलेश इंगळे असे या तरुणाचे नाव असून, तो पश्चिमेकडून पूर्वेला जात होता. मोबाइलवर बोलत असताना अचानक दोघे जण आले आणि मारहाण करत, त्याचा मोबाइल हिसकावून पळून गेले. यात नीलेशच्या मानेला दुखापतही झाली आहे. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.सुरक्षारक्षक नेमण्याची गरजवाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे स्कायवॉकचा वापर करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. स्कायवॉकवर सुरक्षारक्षक नेमण्याबाबत वारंवार मागणी होत आहे. आता तरी ठोस कृती होईल का, याकडे लक्ष लागले आहे.